News Flash

स्वादिष्ट सामिष : सुकटी भरलेली वांगी

वांग्यात दोन काप देऊन चार भाग करून घ्यावे व पाण्यात ठेवावे. जवळा तव्यावर कुरकुरीत भाजून घ्यावा.

दीपा पाटील

साहित्य

एक वाटी जवळा, सहा वांगी, एक लहान कांदा, दीड वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, दोन टेबलस्पून लाल तिखट/आगरी मसाला, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ, एक टेबलस्पून कोथिंबीर, एक टिस्पून लसणीचा ठेचा, तेल मीठ चवीनुसार.

कृती- 

वांग्यात दोन काप देऊन चार भाग करून घ्यावे व पाण्यात ठेवावे. जवळा तव्यावर कुरकुरीत भाजून घ्यावा. नंतर त्यात खोबऱ्याचा कीस, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, लसूण, लाल तिखट, चिंचेचा कोळ, मीठ टाकून चांगले मिश्रण करावे. नंतर हे मिश्रण वांग्यांमध्ये भरावे. तव्यावर वांगी तळण्यास ठेवावीत. वर झाकण ठेवून वांग्याच्या दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्याव्यात.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 1:13 am

Web Title: sukati bharleli vangi recipe in marathi for loksatta readers
Next Stories
1 मुखदुर्गंधी धोकादायक!
2 आजारांचे कुतूहल  : गर्भाशयाचा कर्करोग
3 काळजी उतारवयातली : उन्हाळ्यातील आजार आणि काळजी
Just Now!
X