व्हिटॅमिन C चा उत्तम स्त्रोत असलेला आवळा अनेक प्रकारे खाल्ला जातो. आवळ्याचे लोणच्यापासून मुरब्ब्यापर्यंत ते स्वादिष्ट दिसते. सध्या तुम्ही त्याची चटणीही बनवू शकता. लहान मुलं किंवा मोठे व्यक्ती आवळा खाताना नाकं मुरडतात. जर आपल्यालाही आवळा खायला आवडत नसेल तर, आवळ्याची चटणी तयार करून खा. चमचमीत आवळा चटणी तोंडी लावण्यासाठी बेस्ट आहे. आवळ्याची चटणी नेमकी कशी करायची? पाहुयात.

आवळ्याची चटणी साहित्य

ताजे आवळे

कोथिंबीर

हिरवी मिरची

लसूण

कांद्याची पात

आलं

पुदिना

कडीपत्ता

धणे

जीरे

मीठ

लिंबाचा रस

आवळ्याची चटणी कृती

सर्वप्रथम कढई गरम करून तेल घालून त्यात मेथीदाणे, कढीपत्ता व सुक्या लाल मिरच्या, जिरे घालून फोडून घ्यावे.

त्यात चिरलेला आवळा घालून मीठ घालावे. मंद आचेवर शिजवा. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर ग्राइंडरमध्ये बारीक करा.

थोडासा गोडवा येण्यासाठी त्यात थोडा गूळ घाला. अशा प्रकारे गोड आणि आंबट आवळ्याची चटणी तयार होईल.

हेही वाचा >> हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी

अशा प्रकारे आवळ्याची चमचमीत चटणी खाण्यासाठी रेडी. आपणही चटणी चपाती, भाकरी किंवा पराठेसोबत खाऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केसांच्या वाढीसाठी तर आवळा बहुगुणी मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे केसांच्या वाढीस मदत करते. आवळा केसांच्या कूपांमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणावाचे परिणाम कमी करून केसांच्या वाढीस मदत करते