Ashadhi Ekadashi 2023: महाराष्ट्रात विठुरायाचे भक्त आपली भक्त दाखवण्यासाठी आषाढी एकादशीला उपवास करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जण आषाढी एकादशीला दुपारी आणि रात्रीच्या जेवणात उपवासाचे पदार्थ खात असतो. त्याच्यासाठी खास स्वदिष्ट उपवासाच्या पदार्थांचे तुमच्यासाठी आहे. उपवासाला सामान्यपणे साबुदाणाखिचडी केली जाते. मात्र काहीवेळा काहीतरी झटपट पण चविष्ट असे पदार्थ खाण्याचीही लोकांची इच्छा होते. आषाढी एकादशीसाठी खास उपवासाचा खास पदार्थ आपण पाहुयात. आज आपण बघणार आहोत वरीच्या तांदळाचा पुलाव, चला तर जाणून घेऊया कसा बनवायचा हा पुलाव

वरीच्या तांदळाचा पुलाव साहित्य –

  • एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप
  • दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आले
  • साखर व मीठ चवीनुसार, अर्धा कप दाण्याचा कूट
  • दहा-बारा बेदाणे, अर्धा कप रताळ्याच्या फोडी
  • कोथिंबीर, दहा-बारा काजूचे तुकडे

वरीच्या तांदळाचा पुलाव कृती-

वऱ्याचे तांदूळ धुवून ठेवावेत. एका मोठय़ा भांडय़ात तूप गरम करून त्यात जिरे, लवंग, मिरचीचे तुकडे घालावेत. वरी तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. त्यात बटाटय़ाच्या फोडी आणि रताळ्याच्या फोडी घालाव्यात. दाण्याचा कूट, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे.

दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. हे त्या वरीवर घालून छान मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालून छान वाफ द्यावी.

हेही वाचा – आषाढी एकादशीला करा गोड पदार्थ, असा बनवा चविष्ट राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा, रेसिपी जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप- सुरणाच्या फोडी, रताळ्याच्या फोडी वेगळ्या शिजवून तुपात थोडय़ा परतून शेवटी वऱ्याच्या तांदळात मिसळल्या तरी चालतात.