Breakfast Recipe : दररोज नाश्त्याला काय बनवावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. नेहमी इडली, डोसा, पोहे, उपमा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर एक हटके नाश्ता बनवू शकता. फक्त एक वाटी गव्हाचे पीठ आणि दोन कांद्यांपासून तुम्ही हा टेस्टी नाश्ता बनवू शकता. अत्यंत कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ चवीला खूप स्वादिष्ट वाटतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक वाटी गव्हाचे पीठ आणि दोन कांद्यांपासून तुम्ही कोणता पदार्थ बनवू शकता. तुम्ही यापासून अत्यत टेस्टी असा कांद्याचा पराठा बनवू शकता. हा कांद्याचा पराठा कसा बनवायचा, त्यासाठी खालील रेसिपी नोट करा. (Breakfast Recipe from wheat flour and two onions)
साहित्य
- गव्हाचे पीठ
- मीठ
- तेल
- कांदे
- हिंग
- लाल तिखट
- जिरे
- मीठ
- हिरवी मिरची
- मसाला
- तूप
हेही वाचा : Recipe : झटपट तयार होणारा चटपटीत कैरीचा तक्कू! पाहा १० मिनिटांत तयार होईल हा उन्हाळी पदार्थ
कृती
- एक वाटी गव्हाच पीठ घ्या.
- त्याच चवीनुार मीठ टाका.
- त्यानंतर त्यात थोडे तेल टाका आणि मिश्रण एकत्र करा.
- त्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून आपल्याला घट्टसर हे पीठ मळून घ्या.
- पीठ मळून घेतल्यानंतर त्यावर अर्धा चमचा तेल घाला आणि पुन्हा मळून घ्या.
- त्यानंतर थोडा वेळ हे पीठ झाकून ठेवा.
- त्यानंतर दोन कांदे घ्या आणि स्वच्छ धुवा.
- कांदे उभे चिरून घ्या.
- कांद्याना व्यवस्थित चिरून घेतल्यानंतर दोन हिरवी मिरची घ्या आणि त्याला बारीक चिरून घ्या. त्यानंतर चिरलेला कांदा आणि हिरवी मिरचीचे मिश्रण एकत्र करा.
- एक वाटी घ्या. त्यात मीठ, मिश्र मसाला, लाल तिखट, जिरे, हिंग एकत्र करा. तुमचा मसाला तयार होईल.
- त्यानंतर झाकुन ठेवलेल्या पीठ घ्या आणि एक छोटा गोळा बनवा.
- त्यानंतर या गोळ्यापासून थोडी जाडसर अशी पोळी लाटून घ्या.
- पोळीवर साजूक तूप लावा. त्यानंतर थोडं गव्हाचं पीठ लावा. त्यावर कांदा आणि मिरची ठेवा. त्यानंतर तयार केलेला मसाला कांदा मिरचीवर टाका आणि एकजीव करा. त्यानंतर त्यावर थोडं गव्हाचं पीठ टाका. त्यानंतर या पोळीचा गोळा तयार करा.
- या गोळ्याला गव्हाचे पीठ लावून चांगला पराठा लाटून घ्या.
- पराठा लाटून घेतल्यानंतर गरम तव्यावर साजूक तूप टाका आणि त्यावर हा पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
- हा पराठा तुम्ही दही किवा आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.
- अशाप्रकारे तुम्ही काद्यांचा पराठा घरी बनवू शकता.
- अगदी कमी वेळेत तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता.