किनवा हे दक्षिण अमेरिकेतील धान्य आहे. विशेष म्हणजे सर्व अमायनो अॅसिड एकत्रित असणारे हे एकमेव धान्य असल्याने आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. किनवा जरी दक्षिण अमेरिकेतील धान्य असले तरी हे धान्य भारतातसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा किनवा आपल्या आहारात घेऊ शकता.
किनवाचा उपमा खूप टेस्टी आणि हेल्दी असतो. तुम्हाला किनवाचा उपमा बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी जाणून घ्या.
Jamun Icecream Recipe: नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली जांभूळ आइस्क्रीम, उन्हाळ्यात नक्की ट्राय करा
साहित्य-
- किनवा अर्धी वाटी, (१ तास आधी पाण्यात भिजत ठेवा.)
- गाजर
- फरसबी
- फ्लावर १ वाटी
- वाफवून मोड आलेले मसूर अर्धी वाटी वाफवून (ऑप्शनल),
- पुदिना ८-१० पाने
- कांदा छोटा १ बारीक चिरून
- फोडणीचे साहित्य
हेही वाचा : नेहमीची चाट खाऊन कंटाळला असाल तर, आता ट्राय करा मोड आलेल्या मुगाची चाट; जाणून घ्या सोपी रेसिपी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कृती-
- प्रथम फोडणी करून त्यामध्ये छोटा चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
- त्यामध्ये वाफवलेल्या भाज्या घालून चांगले परता.
- यामध्ये वाफवलेले मसूर आणि किनवा घालून मीठ घालून हलवा.
- थोडा पुदिना घालून एक वाफ येऊ द्या.
- रुचकर उपमा तयार आहे.
(टीप : किनवाऐवजी दलिया घेऊ शकता.)