Jamun Icecream Recipe: उन्हाळा आला की आंबे, जांभळे, करवंद, कलिंगड अशी भरपूर रससशीत फळं उपलब्ध असतात. मग एवढ्या उकाड्यात मस्त काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण सरबत करतो, फळांपासून ज्यूस तयार करतो. आईस्क्रिम तर सारखी खातो, मात्र आज आम्ही तुमच्यासाठी एका स्पेशल आईस्क्रिमची रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही आणलीये जांभूळ आईस्क्रिम रेसिपी. ही आईस्क्रिम तुम्हाला नक्की आवडेत. चला तर पाहुयात कशी करायची जांभूळ आइस्क्रीम. जांभूळ आइस्क्रीम साहित्य आणि प्रमाण : २५० ग्रॅम जांभळं१/२ कप अमूल फ्रेश क्रीम१/२ कप म्हशीचे कच्चे दूध (निरसं)१/२ कप मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर२ टीस्पून खडीसाखर पावडर किंवा पिठीसाखर सुरुवातीला एक बाऊल घ्या, त्यामध्ये ५० ग्रॅम जांभळं, १/२ कप अमूल फ्रेश क्रीम, १/२ कप म्हशीचे कच्चे दूध (निरसं), १/२ कप मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर आणि २ टीस्पून खडीसाखर पावडर किंवा पिठीसाखर मिक्स करा. त्यानंतर हे सर्व फ्रिजमध्ये ठेवा. १५ मिनिटांनी हे सर्व सारे साहित्य एकत्र करा आणि ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि फ्रीझरमध्ये ठेवा. २ तासांनंतर आईस्क्रीमचा बाऊल काढा आणि वरून पिस्ता काप टाकून सजवा., आणि सर्व्ह करा. आपली जांभूळ आइस्क्रीम तयार आहे. हेही वाचा - Fruit Modak Recipe : मोदक खायला आवडते? असे बनवा स्वादिष्ट अन् हेल्दी फळांचे मोदक जांभूळ अनेक गुणांनी परिपूर्ण असणारे फळ आहे. याचा वापर शरीराला बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही प्रकारे शुद्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो. जांभळाची साल हे रक्त शुद्ध करणारी आहे, तुमचे रक्त आतून स्वच्छ करते आणि तुमच्या त्वचेची बाहेरून काळजी घेते.