अनेकदा आपल्याला एकसारख्या चवीचा, पद्धतीचा स्वयंपाक बनवून आणि खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आपल्याला एखाद्या दिवशी काहीतरी वेगळे खावेसे वाटते. अशा वेळेस विशेष कष्ट नसणारी डाळ ढोकळी हा पदार्थ फारच मस्त पर्याय आहे. गुजरातमधील डाळ ढोकळी हा केवळ तूर डाळ आणि कणिक यांचा वापर बनवून केला जातो.

आपण जशी आमटी बनवतो अगदी त्याचप्रमाणे हा पदार्थ तयार केला जात असला तरी त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. डाळ ढोकळीला महाराष्ट्रात वरण फळदेखील म्हंटले जाते. तुम्हाला एखाद्या दिवशी स्वयंपाकातून थोडासा आराम हवा असल्यास, हा स्वादिष्ट पदार्थ बनवून पाहा.

हेही वाचा : Recipe : खानदेशी पद्धतीने बनवा झणझणीत मटण करी; पाहा ही रेसिपी

डाळ ढोकळी कशी बनवावी पाहा

साहित्य

तूर डाळ
गव्हाचे पीठ
बेसन
हिरवी मिरची
कडीपत्ता
कोथिंबीर
आले
टोमॅटो
मोहरी
हिंग
जिरे
लवंग
दालचिनी
हळद
मीठ
गुळ
चिंच किंवा आमसूल
उकडलेले शेंगदाणे
ओवा
तूप

हेही वाचा : Recipe : पोळीप्रमाणे झटपट लाटा तांदळाची भाकरी; बोनस टीपसह पाहा ‘ही’ सोपी ट्रिक

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • सर्वप्रथमी एक कप/ वाटी तुरीची डाळ मीठ आणि हळद घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.
  • आता एका पातेल्यात तूप घालून त्याला तापू द्यावे.
  • तूप तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लवंग आणि दालचिनी घालून सर्व पदार्थ तडतडू द्यावे.
  • नंतर यात आले आणि मिरची वाटून बनवलेली पेस्ट आणि बारीक चिरलेले टोमॅटो घाला.
  • सर्व पदार्थ काही मिनिटांसाठी परतून घ्या.
  • आता शिजवलेली डाळ चांगली घोटून मग पातेल्यात घालून घ्या.
  • डाळीला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये गुळ, चिंचेचे पाणी किंवा आमसूल घालून घ्यावे.
  • मंद आचेवर डाळ शिजवत ठेवा.
  • एका परातीमध्ये गव्हाचे पीठ, बेसन एकत्र करून घ्या.
  • त्यामध्ये ओवा, चावी पुरते मीठ, हळद, हिंग आणि तिखट घालून पीठ मळून घ्या.
  • लाटलेल्या पिठाची हलकी जाडसर पोळी लाटून लहान लहान चौकोनी तुकडे कापून घ्या.
  • तुकडे केलेले कणकेचे तुकडे म्हणजेच ढोकळी शिजत असणाऱ्या डाळीमध्ये घालून घ्यावी.
  • सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उकडलेले शेंगदाणे घालून गरमागरम खावे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @natashaagandhi नावाच्या अकाउंट वरून या चविष्ट पदार्थाची रेसिपी शेअर केलेली आहे. रेसिपीच्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ३.९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.