तुम्ही आजपर्यंत फणसाचे गरे त्याच्या भाजलेल्या बिया इतकेच काय फणसाची भाजीदेखील खाल्ली असेल. अनेकांनी फणसाचे कोफ्तेगी चाखले असतील पण या सर्वांपेक्षा भन्नाट आणि स्वादिष्ट अशी फणसाची पोळी खाल्लेय का? आणि तुमचं उत्तर नाही असं असेल, तर आम्ही तुम्हाला आज फणसाची पोळी करण्याची खास रेसिपी सांगणार आहोत. जी तुम्ही कोणत्याही प्रसंगी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया फणसाची पोळी कशी बनवायची ते.

फणसाची पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे –

साहित्य –

हेही वाचा- घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर मटकी भजी; जाणून घ्या सोपी रेसिपी

  • फणस (मध्यम आकाराचा, बरका) १
  • साखर १ कप

कृती –

फणस कापून त्यातला गर काढून घ्या व बिया वेगळ्या करा. गर मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्या. एका मोठ्या भांड्यात घेऊन गॅसवर ठेवून ढवळत राहा. त्यात साखर घालून मिश्रण एकत्र करा व ढवळा. साधारण ७-८ मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवा. त्याचा रंग व घनता काही प्रमाणात बदललेली दिसेल. काही मोठ्या ताटांना तूप लावून घ्या. ताटांवर पळीनं मिश्रण पसरवा. पसरताना फार जाड नाही व फार पातळ नाही अशा पद्धतीनं पसरवा. उन्हात वाळवा.

हेही वाचा- चवीला भारी आणि जेवणात रंगत आणणाऱ्या चटकदार आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी जाणून घ्या

उपयोग –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फणस हा गोड असून शरीराचं बळ व वजन वाढवायला मदत करतो. या पद्धतीनं पोळी बनवल्यास वर्षभरदेखील फणस खाण्याचा आनंद मिळू शकेल.