संध्याकाळी भूक लागल्यावर चाटसारख्या पदार्थांनंतर सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे, मोमोज. मात्र मोमो तयार करण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. त्यामुळे जे मैदा खाणे टाळतात किंवा जे अधिक पौष्टिक आहार घेण्याकडे भर देत असतात, त्यांनी ही मोमोची पौष्टिक रेसिपी नक्की पाहा.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sagarskitchenofficial नावाच्या अकाउंटवरून तांदळापासून मोमो कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवली आहे. या रेसिपीमध्ये मैद्याचा अजिबात वापर केलेला नाहीये. तसेच मैद्याऐवजी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. चला तर मग, बिना मैद्याचे मोमो कसे बनवायचे ते पाहू.

हेही वाचा : Recipe : पोळीप्रमाणे झटपट लाटा तांदळाची भाकरी; बोनस टीपसह पाहा ‘ही’ सोपी ट्रिक

साहित्य

२ कप पाणी
२ कप तांदळाचे पीठ
ऑलिव्ह तेल
मोमोचे सारण
मीठ

कृती

सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यावे.
पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये दोन कप तांदळाचे पीठ घालून ते ढवळत राहा.
पिठाचा गोळा झाल्यानंतर पातेल्याखालील गॅस बंद करून तयार झालेली तांदळाची उकड १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

हेही वाचा : Recipe : ‘अशा’ पद्धतीने बनवून पाहा गाजराचे चटपटीत लोणचे; काय आहे प्रमाण जाणून घ्या

दहा मिनिटांनंतर तांदळाच्या पिठाचे मोमो बनवण्यास सुरवात करा.

यासाठी तांदळाच्या पिठाचे लहान गोळे बनवा आणि अंगठ्याला थोडेसे तेल लावून गोळ्याला आकार द्या.
तांदळाच्या पिठाच्या गोळ्याचा मध्यभाग पोकळ ठेऊन त्यामध्ये तयार मोमोचे सारण भरून घ्या.
यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्यांचे किंवा चिकनचे सारण भरून मोमो बंद करून घ्या.

आता एका स्टीमरमध्ये आधी पाणी उकळून घ्या आणि ५ ते ७ मिनिटांसाठी त्यामध्ये मोमो शिजवून घ्या.
तयार गरमागरम मोमो, चटणीसह खावे.

View this post on Instagram

A post shared by Sagar Kumar (@sagarskitchenofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sagarskitchenofficial नावाच्या अकाउंटवरून या तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या मोमोची रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपी व्हिडीओला आत्तापर्यंत १.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.