रोज रोज पोळी-भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. जेवताना आपल्याला सोबत काही ना काही तोंडी लावायला हवंच असतं. त्यातल्या त्यात ‘वडी’ हा प्रकार महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळीमधील सर्वात महत्वाचा प्रकार आहे. ताटात कोणती ना कोणती ‘वडी’ असल्याशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होतंच नाही. आतापर्यंत तुम्ही कोथिंबीर वडी, अळू वडी खाल्ली असेल पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कोबीच्या वड्या. कोबीची भाजी फारशी कोणाला आवडत नाही. मात्र या वड्या तुम्हाला नक्की आवडतील.

कोबीच्या वड्या साहित्य –

  • बारीक चिरलेला कोबी १ वाटी
  • बेसन २ वाट्या
  • बाजरीचे पीठ १ वाटी
  • कणीक अर्धी वाटी
  • थोडे तीळ, जिरेपूड
  • ५-६ हरव्या मिरच्या
  • चिमूटभर हळद, चवीपुरते मीठ
  • तळणीसाठी तेल

कोबीच्या वड्या कृती –

हिरवी मिरची व मीठ मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. सर्व पिठांचे प्रकार एकत्र करावे. त्यानंतर त्यात वाटलेली हिरवी मिरची, तीळ, हळद, जिरेपूड, चिरलेला कोबी घालून पाण्यानं घट्ट भिजवून घ्यावे. नंतर थाळीत थापून कुकुरमध्ये वाफवून घ्यावे. नंतर थाळीत थापून कुकुरमध्ये वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वड्या कापून तेलात लालसर रंगावर तळाव्यात. अशा प्रकारे पालक, भोपळा या भाज्यांचाही वड्या करता येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोबी आरोग्यासाठी पौष्टीक –

कोबीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. काहींना कोबी खायला आवडते तर काहींना नाही. कोबीची भाजी, कोबीची भजी, कोबीचे पराठे, अशा व अनेक प्रकारचे पदार्थ कोबीपासून बनवले जातात. कोबी हे फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ए आणि के तसेच इतर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. कोबी रोगप्रतिकारशक्ती सुधारते. त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आढळते. ही भाजी कच्ची, सॅलडच्या स्वरूपात आणि अगदी सूपच्या स्वरूपातही खाल्ली जाते.