कॅरॅमल पासून बनवलेले पदार्थ खायला अनेकांना आवडतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कॅरॅमलचे वेड आहे. एखाद्या प्लेन आईस्क्रीमवर कॅरॅमल घालून खाल्ल्यास त्याची चव अधिकच वाढते. कॅरॅमल पासून कॅरॅमल पॉपकॉर्न, कॅरॅमल कस्टर्ड, कॅरॅमल आईस्क्रीम यांसारखे अनेक पदार्थ बनवता येतात. पण तुम्हाला माहीत आहे की हा सॉस तुम्ही घरच्याघरी देखील बनवू शकता. कॅरॅमल सॉस अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतो. तसंच हा सॉस बरकंग6 काळ टिकतो. चला तर मग जाणून घेऊया कॅरॅमल सॉस बनवण्याची झटपट कृती आणि त्यासाठी लागणारे साहित्य..

साहित्य

  • पाणी १/४ कप
  • साखर १ कप
  • बटर ४ टेबलस्पून
  • व्हॅनिला इसेन्स १/२ टेबलस्पून
  • फ्रेश क्रिम १/२ कप
  • मीठ

Your Food Lab या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Your Food Lab (@yourfoodlab)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

( हे ही वाचा: कॅन्सरपासून ते डायबिटीजपर्यंत ‘या’ ९ आजारांवर आवळा ठरेल वरदान! जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत)

बनवण्याची सोपी पद्धत

  • एक पॅन घ्यावे आणि त्यात साखर घालावी. यानंतर त्यात पाणी ओतावे. यानंतर मंद आचेवर ही साखर कॅरॅमलाइज्ड होईपर्यंत उकळवून घ्यावी. ही प्रक्रिया सुरू असताना चमच्याने ढवळू नका. असे केल्यास साखरेचे खडे तयार होऊ शकतात आणि पाक घट्ट होऊ शकतो.
  • साखर कॅरॅमलाइज्ड झाल्यानंतर त्यात बटर घालावे आणि त्यांनतर हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे.
  • बटर चांगले मिसळल्यास गॅस बंद करा आणि त्यामध्ये फ्रेश क्रिम आणि व्हॅनिला इसेन्स घाला. यानंतर हे सर्व एकत्र करून घ्या.
  • यानंतर कॅरॅमल सॉस थंड करून घ्या. कॅरॅमल सॉस थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  • हा कॅरॅमल सॉस डब्यात घट्ट पॅक करून ठेवला तर २० ते २५ दिवस चांगला टिकतो.