अनेकदा लहान मुलांना हिरव्या भाज्या फारशा आवडत नाहीत. विशेषतः मटार. मटार सारख्या भाज्या मुलं सहज आपल्या ताटातून बाजूला काढतात. मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @marathikitchen नावाच्या अकाउंटने शेअर केली ही कुरकुरीत मटार रोल रेसिपी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. कसा बनवायचा हा पदार्थ पाहूया.

साहित्य

hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
kids at home
शाळांना सुट्ट्या लागल्या, मुलांना कुठे ठेवायचं? पालकांच्या प्रश्नांची सोपी उत्तरे!
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी

१ कप मटार
१ उकडलेला बटाटा
१ बारीक चिरलेला कांदा
१ चमचा धणे
१ चमचा बडीशेप
१/२ चमचा जिरे
२ लवंग
४ मिरी
१ चमचा कॉर्न फ्लॉवर
४ लसूण पाकळ्या
२-३ हिरवी मिरची
दालचिनी तुकडा
आले
हिंग
हळद
ब्रेड

हेही वाचा : Sunday special : कुरकुरीत पुरी ते झणझणीत पाणी; घरच्याघरी कशी बनवावी पाणीपुरी? पाहा ही रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी तापत ठेवा. त्यामध्ये ताजे मटार पाच मिनिटांसाठी वाफवून घ्या.
  • आता एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, लवंग, मिरी, जिरे आणि दालचिनी असे सर्व मसाले छान बाजून घ्या.
  • मसाले भाजल्याचा खमंग गंध आल्यानंतर पॅनमधील सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या.
  • आता यामध्ये हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण घालून छान वाटण बनवून घ्या. तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी-जास्त करा.
  • यानंतर पुन्हा एक खोलगट पॅनमध्ये थोडे तेल तापवून घ्या.
  • तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
  • कांदा काही वेळ परतल्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद आणि तयार केलेले वाटण घालून घ्या.
  • सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळून घ्या.
  • आता सुरवातीला वाफवलेले मटारदेखील मिक्सरमध्ये भरभरीत असे वाटून पॅनमध्ये घाला.
  • सर्वात शेवटी उकडलेला बटाटा कुस्करून तयार होणाऱ्या मटार रोलच्या सारणात घालून घ्या.
  • चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ व्यवस्थित शिजवून घ्या.
  • पदार्थ शिजल्यानंतर गॅस बंद करा.

हेही वाचा : Recipe : ताक वापरुन सिमला मिरचीची भाजी कधी बनवली आहे का? ही भन्नाट रेसिपी पाहा, करून पाहा

  • मटार रोल बनवण्यासाठी ब्रेडच्या कडा कापून टाका.
  • आता ब्रेडला लाटण्याच्या साहाय्याने हलके लाटून घ्या.
  • नंतर ब्रेडवर अगदी हलक्या हाताने पाणी शिंपडून घ्या.
  • लाटलेल्या ब्रेडमध्ये तयार केलेले मटाराचे सारण भरून घ्या.
  • ब्रेडमध्ये सारण भरू झाल्यावर तो रोलकरून बंद करून त्याला ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्या.
  • ब्रेड व्यवस्थित बंद होण्यासाठी कॉर्न फ्लॉवर पाण्यात घोळवून ब्रेडच्या कडांना लावून, ब्रेड बंद करा.
  • आता पुन्हा एका खोलगट पॅनमध्ये तेल तापवत ठेवा.
  • तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले ब्रेड रोल्स हलक्या हाताने सोडा.
  • मटार रोल सोनेरी रंगाचे झाल्यानंतर त्यानं तेलातून बाहेर काढा.
  • तयार मटार रोल टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर खाता येऊ शकतात.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @marathikitchen नावाच्या अकाउंटने या स्वादिष्ट रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला ९८.५K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.