खवय्यांसाठी सुखाचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे खवय्ये आपल्या जीभेचे फार लाड करत असतात, रोज नवे नवे पदार्थ त्यांना हवे असतात. अशात रोज काय नवनवीन करायचं? हा अनेकांपुढे असलेला प्रश्न आहे. तर काळजी करु नका आम्ही तुमच्यासाठी एक नवीन आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आलो आहोत.. या रेसिपीचं नाव आहे बाजरीचा उपमा. आतापर्यंत तुम्ही फक्त रव्याचा उपमा खाल्ला असेल पण हा हेल्थी बाजरीचा उपमा नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा हा बाजरीचा उपमा.

बाजरीचा उपमा साहित्य –

  • बाजरीचा रवा 1 कप
  • कांदा 1, मिरच्या 3, गाजर 1
  • किसलेले आले 1 चमचा, मोहरी 1 चमचा
  • उडीद डाळ पाव चमचा, हरभरा डाश पाव चमचा
  • कढीपत्ता 5-6 पानं, तेल 2 चमचे

बाजरीचा उपमा कृती –

बाजरीचा रवा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुऊन घ्या. कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी घाला, त्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ, कढीपत्त्याची पाने आणि चिरलेली मिरची घाला. डाळीचा रंग सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये कांदा, आल्याची पेस्ट, हळद घालून मंद आचेवर परतून घ्या, गाजर टातून 2 ते 3 मिनिटे पुन्हा परतून घ्या. नंतर बाजरीचा रवा टाकून 1 मिनिटांसाठी सगळ्या गोष्टी एकत्र परतून घ्या. त्यात 4 कप गरम पाणी आणि मीठ घालून उपमा शिजवून घ्या. नंतर उपमा एका प्लेटमध्ये काढून उपम्यावर छान कोथिंबीर गार्निश करावी. यानंतर गरमागरम बाजरीच्या उपम्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

हेही वाचा – (लिंबू सरबत विसरुन जाल! या उन्हाळ्यात ट्राय करा थंडगार काकडी सरबत)

तर तुम्हालाही नाष्ट्याला आज काय नवीन बनवायं हा प्रश्न पडला असेल तर लगेच ही पोष्टिक रेसिपी ट्राय करा आणि घरातील मंडळींनाही खूश करा.