उन्हाळा सुरु झाला आहे. रसाळ आणि भरपूर पाणी असणारी फळे आपल्याला कडक उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्यास, शरीराला थंडावा देण्यास मदत करतात. तसेच अशा वातावरणामध्ये गारेगार वेगवेगळ्या फळांची सरबतंसुद्धा हमखास प्यायली जातात. यामध्ये पन्हे, लिंबू आणि कलिंगडाचे सरबत सर्वांच्या आवडीचे असते. मात्र तुम्ही कधी द्राक्षाचे सरबत प्यायले आहे का?

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर bhannat_swaad नावाच्या अकाउंटवरूने द्राक्षाच्या सरबताची अतिशय सोपी आणि भन्नाट रेसिपी शेअर केली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात द्राक्षाचे हे आंबट-गोड सरबत बनवून पाहा

हेही वाचा : Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…

द्राक्षचे सरबत

साहित्य

द्राक्ष
पुदिना
आले
लिंबू
जिरे पूड
चाट मसाला
मीठ
साखर
बर्फ

हेही वाचा : फक्त १० मिनिटांत बनवा कॅफेसारखी फेसाळ Cold coffee! गाळण्याचा ‘असा’ वापर करून पाहा

कृती

सर्वप्रथम सर्व द्राक्षे देठांपासून वेगळे करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.
आता धुतलेली द्राक्ष मिक्सरच्या भांड्यात टाका.
त्यामध्ये आल्याचा एक लहानसा तुकडा, पुदिन्याची ४ ते ५ स्वच्छ धुतलेली पाने आणि चमचाभर लिंबाचा रस घालून घ्या.
तसेच मिक्सरच्या भांड्यात चवीपुरते मीठ, एक चमचा साखर, जिरे पूड, चाट मसाला आणि बर्फाचे खडे घालून मिक्सरच्या भांड्याला झाकण लावावे.
आता सर्व पदार्थ मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या.
एका उंच ग्लासमध्ये बर्फाचे दोन ते तीन खडे टाका आणि मिक्सरच्या भांड्यात वाटून तयार झालेले द्राक्षाचे आंबट गोड सरबत ओतून घ्यावे.
सजावटीसाठी सरबतावर वरून दोन तीन पुदिन्याची पाने ठेऊन द्यावी, थंडगार द्राक्षाचे सरबत तयार आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @bhannat_swaad नावाच्या अकाउंटने या भन्नाट आणि थंडावा देणाऱ्या द्राक्षाच्या सरबताची रेसिपी शेअर केली आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ४७.२K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.