वजन कमी करण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, आजारपणातील झीज भरुन काढण्यासाठी मोड आलेली कडधान्यं खाण्याला सध्या खूप महत्त्व आलं आहे.कडधान्यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात. मधुमेह, हृदयाचे आरोग्य, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी बाजरी खूप फायदेशीर असते. कडधान्य खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 6 हे पोषक तत्व मिळतात. तुम्ही आतापर्यंत बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी खाल्ली असेल.पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कडधान्य भाकरी. आज आम्ही तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील कडधान्य भाकरीची रेसिपी घेऊन आलो आहोत.

कडधान्य भाकरी साहित्य –

  • १ किलो ज्वारी
  • पाव वाटी गहू
  • अर्धी वाटी पिवळे हरभरे
  • अर्धी वाटी चवळी
  • अर्धी वाटी मूग
  • अर्धी वाटी मटकी
  • पाव वाटी सोयाबीन
  • पाव वाटी उडीद
  • १ चमचा धणे
  • १ चमचा ओवा
  • १ चमचा मेथी
  • चवीनुसार मीठ

कडधान्य भाकरी कृती –

वरील सर्व धान्य व कडधान्य गिरणीतून बारीक दळून आणावे. भाकरी करायची असताना हे पीठ घेऊन त्यात मीठ व पाणी घालून व्यवस्थित गोळा मळून भाकरी करावी. त्यानंतर गॅसवर तवा गरम करत ठेवा आणि भाकरी गोल थापून शेकवून घ्या. ही भाकरी गरम गरमच वरुन लोणी घालून कुठल्याही चटणी किंवा लोणच्याबरोबर खावी.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
summer special recipe Kairichi Aamti Kadhi how to make karichi kadhi recipe in marathi
चटपटीत, आंबट-गोड ‘कैरीची कढी’, पोळी भाकरी, खिचडी भाताबरोबर खाण्यासाठी बेस्ट; ही घ्या रेसिपी
Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe
भंडाऱ्यातली बटाटा भाजी चवीला एकदम स्पेशल.. भंडारा स्पेशल भाजीची घ्या झणझणीत रेसिपी
Upvasachi bhakari and batata rassa
उपवासाची भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी; ही घ्या मस्त रेसिपी, फराळही होईल चमचमीत-चवदार

कडधान्यांचे फायदे

कडधान्य खाल्याने पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते. फायबरयुक्त मोड आलेले कडधान्य खाल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते.  कडधान्यांमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन ए, बी, सी, ई मुबलक प्रमाणात असतात. एवढचं नव्हे तर त्यामध्ये फॉस्फरस, आयरन, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यांसारखी पौष्टिक तत्व असतात. अ‍ॅन्टी-ऑक्सिडेंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शिअममुळे हाडांमध्ये ताकद येते. आयर्न रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी मदत करतं. 

हेही वाचा – Chole Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे चटपटीत छोले फ्राय; ही घ्या सोपी रेसिपी

तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.