scorecardresearch

पुरी खायला आवडते? मग कधी ‘मटकी पुरी’ ट्राय केली का? वाचा रेसिपी

अगदी कमी वेळात तयार होणारी मटकची पुरी कुरकुरीत, चविष्ट तर आहेच,पण यात शरीरास फायदेशीर घटकही आहेत.

matki puri recipe
मटकी पुरी रेसिपी ( फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Matki Puri Recipe : कडधान्याचा विषय निघाला की मटकीचं नावं आवर्जून घेतलं जातं. कारण लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण मटकीची भाजी, उसळ आवडीने खातात. चवीला चांगली असणारी मटकी आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे मटकीपासूनही अनेक जण वेगवेगळे पदार्थ ट्राय करतात. पण आजवर आपण मटकीची भाजी, उसळ, मिसळ, भजी हेच पदार्थ खाल्ले असतील, पण आज आम्ही तुम्हाला लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून मटकीचा असा काही एक हटके पदार्थ सांगणार आहोत जो तुम्ही देखील पहिल्यांदाच ऐकला असेल. आज मटकीची कुरकुरीत पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहेत. चवीला चमचमीत, कुरकुरीत ही पुरी घराच्या घरी कशी करतात त्याची झटपट सोप्पी रेसिपी जाणून घेऊ….

मटकीची पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे –

साहित्य :

१) १ वाटी मटकीचं पीठ
२) अर्धी वाटी बेसन
३) सैंधव मीठ चवीनुसार
४) पाव चिमचा जिरे
५) अर्धा चमचा लसून पेस्ट
६) अर्धा चमचा हळद
७) पाणी

कृती :

सर्वप्रथम वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावं. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊ मळून घ्या. आता तयार पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करुन त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्या. आता कढईत तेल गरम करुन त्यात पुऱ्या तळून घ्या. या तयार पुऱ्या तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. किंवा तिखट सॉस, सेजवान चटणीसोबतही खाऊ शकता.

मुलांसाठी पोषक पोटभर, चविष्टही पदार्थ तयार करून ते डब्यात देताना प्रत्येक आईला शक्कल लढवावी लागते. मात्र केव्हातरी मटकी पुरी डब्याला देऊ शकता. तर तुम्हाला ऑफिसमध्ये टाईमपास म्हणून खाण्यासाठीही झटपट तयारी होणारी रुचकर, कुरकुरीत मटकी पुरी एक बेस्ट ऑप्शन होऊ शकते.

मराठीतील सर्व रेसिपी ( Recipes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 18:55 IST