How To Make Prawn Ghee Roast : उद्या बुधवार म्हणजे नॉनव्हेज प्रेमींचा आवडता दिवस. मासे म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. विशेषत: बऱ्याच लोकांना कोळंबी हा मच्छीचा प्रकार भरपूर आवडतो. यामुळे कोळंबीपासून विविध पदार्थ तयार केले जाते. यात तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस किंवा कोळंबीचे कालवण/ रस्सा यांसारखे कोळंबीपासून तयार विविध पदार्थ बनवू शकता. पण, आज आम्ही तुमच्यासाठी बुधवार स्पेशल अस्सल झणझणीत कोळंबीची अनोखी रेसिपी घेऊन आलो आहोत. ऑफिस आणि शाळेतून आलेल्या नॉनव्हेज प्रेमींसाठी खास रेसिपी कशी बनवायची लगेच बघून घ्या…

साहित्य

  • मसाला बनवण्यासाठी
  • २ चमचा धणे
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा बडीशेप
  • ४-५ सुक्या लाल मिरच्या (शक्यतो काश्मिरी मिरच्या)
  • १ चमचा मेथीचे दाणे

व्हिडीओ नक्की बघा…

कृती

  • सुरवातीला कोळंबी हळद, आणि मीठ घालून मॅरीनेट करा.
  • दुसरीकडे एका पॅनमध्ये तूप, मसाल्याची तयार पेस्ट घाला आणि ५ मिनिटे चांगले परतून घ्या.
  • कोळंबी, कढीपत्ता घाला आणि ३ मिनिटे शिजू द्या,
  • तेल सुटले की, काही वेळात तुमची कोळंबी तयार.
  • भात किंवा पराठ्याबरोबर गरम-गरम सर्व्ह करा.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @yummmy__tales या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.