How To Make Veg Keema : बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हणजे महाराष्ट्रातील नॉनव्हेजप्रेमींचा हक्कांचा दिवस असतो. या दिवशी मच्छी, मटण, चिकनचा बेत आखला जातो. यात नेहमी चिकन मसाला, चिकन सुका किंवा मटण बिर्याणी, मटण खिमा पाव, मटण रस्सा, मच्छीचे कालवण यांपैकी विविध पदार्थ बनवले जातात. पण, तुम्ही कधी व्हेज खिमा (Veg Keema) घरी बनवून पहिला आहे का? नाही… तर आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत पौष्टीक आणि चविष्ट व्हेज खिमा कसा बनवायचा हे दाखवण्यात आले आहे.

व्हेज खिमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Veg Keema Ingredients)

  • सोया ग्रॅन्युल्स १०० ग्रॅम
  • पनीर २०० ग्रॅम
  • तूप ५० ग्रॅम
  • जीरा १ चमचा
  • काळी मिरी १ चमचा
  • दालचिनीची काडी
  • लवंगा ४ ते ५
  • काळी वेलची
  • चक्रीफुल १
  • कांदे ४०० ग्रॅम
  • आलं-लसूण पेस्ट एक चमचा
  • कोथिंबीर, पुदिना आणि मिरची पेस्ट १ चमचा
  • टोमॅटो १ लहान
  • १ ते ३ चमचा हळद
  • धने पावडर एक चमचा
  • जिरा पावडर १/२ चमचा
  • लाल मिरची पावडर २ चमचे

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसा बनवायचा व्हेज खिमा (How To Make Veg Keema)

  • सगळ्यात पहिला सोया ग्रॅन्युल्स गरम पाण्यात ठेवा.
  • दुसरीकडे पनीर किसून घ्या.
  • नंतर गाळणीच्या मदतीने सोया ग्रॅन्युल्समधले पाणी काढून घ्या.
  • एका पॅनमध्ये तूप घ्या.
  • त्यात जीरा, काळी मिरी, दालचिनीची काडी, लवंग,काळी वेलची चक्रीफुल, कांदा, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना आणि मिरची पेस्ट आणि मग सोया ग्रॅन्युल्स त्यात टाका आणि व्यवस्थित शिजवून घ्या.
  • नंतर त्यात टोमॅटो, हळद, धने पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, किसलेले पनीर, दही टाकून मिक्स करा. (टीप: दही आवडीनुसार टाका)
  • मिरची आणि कोथिंबीर घालून सजावट करा आणि पाव बरोबर सर्व्ह करा.
  • अशाप्रकारे तुमचा व्हेज खिमा तयार (Veg Keem)…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pawar_omkar या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आला आहे.