Khandeshi Puran Poli Recipe : पुरण पोळी ही महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग आहे. कोणताही सण असो किंवा शुभ कार्य आवडीने पुरण पोळी केली जाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पुरण पोळी तयार केल जाते. आज आपण खान्देशात कशी पुरण पोळी तयार केली जाते, याविषयी जाणून घेणार आहोत.
खान्देशातील पुरण पोळीला पुरणाचे मांडे असे म्हणतात. या पुरण पोळीचा आकार खूप मोठा असतो आणि एका विशिष्ट पद्धतीने ती पुरण पोळी बनवली जाते. या पुरण पोळीबरोबर तुम्ही खीर किंवा उन्हाळ्यात आमरस सुद्धा खाऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुरण पोळी म्हणजेच पुरणाचे मांडे कसे बनवतात, त्यासाठी तुम्हाला सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहावा लागेल. या व्हिडीओमध्ये पुरणाचे मांडे बनवताना दिसत आहे.

पुरणाचे मांडे रेसिपी

या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –
ही पुरणपोळी मातीच्या खापरावर भाजली जाते आणि त्यासाठी चूल पेटवली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सुरुवातील जाडसर अशा दोन गव्हाच्या पीठाच्या पोळ्या लाटून घ्याव्यात. या दोन पोळ्यांच्या मध्ये पुरणाचे सारण भरावा आणि दोन पोळ्यांपासून ही पुरणपोळी एकजीव करावी आणि नीट लाटून घ्यावी. त्यानंतर ही पुरण पोळी हातात घेऊन हाताने सैल करावी. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की महिला हातावर पुरणपोळीचा आकार वाढवत आहे. त्यानंतर ही पुरणपोळी पेटत्या चूलीवर ठेवलेल्या मातीच्या खापरावर टाकावी आणि चांगली भाजावी. पुरण पोळी किंवा पुरणाचे मांडे तयार होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : फक्त १ जुडी कोथिंबीरीपासून बनवा अतिशय सोपी व स्वादिष्ट चटणी; साहित्य, कृती लिहून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

foodland.pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुरणाचे मांडे / खान्देशी पुरणपोळी, महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्हाला खूप आवडतं पण मुंबई ला मिळत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “एवढी मोठी पुरण पोळी कधी संपणार नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “बघून तोंडाला पाणी सुटले, खापरावरची पुरण पोळी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना ही पुरण पोळी खूप आवडली आहेत. काही युजर्सनी व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काहींनी खान्देशाचे कौतुक केले आहेत.