संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या आवर्जून केले जातात. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देण्यासाठी तीळ अतिशय फायदेशीर असतात. तीळामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. तसेच तीळ हे प्रोटीन आणि ओमेगा ३ चा स्त्रोत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यासाठी तीळ खाणे फायदेशीर असते. मकर संक्रांत हा महाराष्ट्र, गुजरात आणि देशाच्या बऱ्याच भागात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण. संक्रांत आली की आपण तिळा पासून वेगवेगळे पदार्थ करतो आज आपण पाहुयात नारळाच्या दुधातील तिळाची खीर कशी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिळाची खीर साहित्य

  • १ कप नारळाच घट्ट दुध
  • १/४ कप नारळाच पाणी
  • १/४ कप तिळकुट
  • २ टेबलस्पून भाजलेले तीळ
  • २ टेबलस्पून किसलेला गुळ
  • १/४ टिस्पून वेलचि पुड
  • २ टेबलस्पून खवलेला नारळ
  • १ टिस्पून बदाम, पिस्ता काप

तिळाची खीर कृती

  • सर्वप्रथम पांढरे तीळ घ्या आणि ते स्वच्छ करा.
  • यानंतर कढईत तीळ घालून थोडा वेळ फ्राय करून घ्या.
  • आता दुस-या भांड्यात दूध घाला आणि मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.
  • भाजलेले तीळ बारीक वाटून घ्या.
  • आता ते दुधात मिसळा, ५-७ मिनिटे शिजू द्या.

हेही वाचा >> Makar Sankranti Special : संक्रांतीला तीळाच्या वड्या, लाडू नेहमीच करतो, यंदा ट्राय करा तीळ-गुळाची पोळी, १० मिनीटांत होणारी रेसिपी

  • खीरमध्ये तुमच्या आवडीनूसार ड्रायफ्रुट्स घाला.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti recipe naralachya dudhatil tilachi kheer recipe in marathi srk
First published on: 11-01-2024 at 12:48 IST