Matki Cutlets: संध्याकाळी मुलं शाळेतून आली की त्यांना कोणता पदार्थ खाऊ घालावा असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. रोज रोज तेच पदार्थ खाऊन मुलंही कंटाळतात. अशावेळी तुम्ही त्यांच्यासाठी चविष्ट मटकीचे कटलेट नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया मटकी कटलेटची सोपी रेसिपी…

मटकीचे कटलेट बनवण्याचे साहित्य:

  • १ वाटी मोड आलेली मटकी
  • १ आल्याचा तुकडा
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • ४-५ मिरच्या
  • १/२ वाटी कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार

मटकीचे कटलेट बनवण्याची कृती:

  • सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेली मटकी, आलं, मिरच्या, कोथिंबीर वाटून घ्या.
  • आता एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून त्यात मीठ, बारीक चिरलेला कांदा मिक्स करा आणि त्याचे कटलेटच्या आकारचे चपटे गोळे बनवा.
  • आता एका पॅनमध्ये थोडं तेल ओतून तयार केलेले मटकीचे कटलेट दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • एका प्लेटमध्ये सॉसबरोबर मटकीच्या चविष्ट आणि पौष्टिक कटलेटचा आस्वाद घ्या.