Mini Handvo Recipe In Marathi: मे महिना काही दिवसांमध्ये संपणार आहे. त्याच्यासह उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील संपत आहेत. सुट्ट्या संपत असल्या तरी, लहान मुलांमधील उत्साह संपलेला नसल्याचे पाहायला मिळते. घरी बसून असल्यामुळे मुलं दररोज खेळण्यात गुंतलेले असतात. सुट्टी एन्जॉय करताना, मित्रांबरोबर खेळताना ते प्रचंड दमतात आणि घरी आल्यावर ‘भूक, भूक’ करत असतात. सुट्टी असल्याने अनेकदा घरचे जेवण खायला त्यांना कंटाळा येतो. तेव्हा घरातल्या गृहिणींना आज नाश्त्याला/जेवणाला काय बनवू असा प्रश्न पडत असतो. तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल, तर तुम्ही ‘मिनी हांडवा’ हा पदार्थ बनवू शकता. गुजराती खाद्यसंस्कृतीतील ही टेस्टी आणि हेल्दी खास डिश ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर कधीही खाता येतो.

साहित्य –

  • तांदूळ ३ वाट्या
  • उडीद डाळ १ वाटी
  • चणा डाळ अर्धी वाटी
  • मूगडाळ अर्धी वाटी
  • ज्वारी रवा १ वाटी (ऑप्शनल) याचे जाडसर पीठ दळून आणा
  • मिरची-लसूण पेस्ट १ चमचा
  • कांदा बारीक चिरून अर्धी वाटी
  • दुधी किसून १ वाटी
  • मेथी चिरून १ वाटी
  • लाल भोपळा किसून अर्धी वाटी
  • तीळ, ओवा, मीठ, फोडणीचे साहित्य

कृती –

  • दोन वाट्या जाडसर पिठात १ चमचा दही व पाणी घालून पीठ एकजीव करा व ४-६ तास झाकून ठेवा.
  • पीठ आंबल्यावर यामध्ये सर्व भाज्या किसून किंवा बारीक चिरून घाला.
  • चवीप्रमाणे मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, हळद, थोडा गूळ घालून पुन्हा मिश्रण एकजीव करा.
  • नॉनस्टिक पॅनमध्ये २ चमचे तेल घ्या. तेल तापले की त्यात मोहरी, तीळ, ओवा घाला. त्यावर पीठ जाडसर पसरवा.
  • यावर झाकण घालून मंद आचेवर वाफवू द्या. रंग बदलला की उलटून पुन्हा दुसरी बाजू थोडा वेळ होऊ द्या.
  • प्लेटमध्ये घेऊन त्याचे आवडीप्रमाणे काप करा. त्यावर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून वाढा.

टीप – कांदा न घालता केल्यास २-३ दिवस टिकेल. धान्य, डाळ, भाज्या यामुळे परिपूर्ण आहार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पौष्टिक गाजर-मूग डाळ कोशिंबीर खाऊन करा Monday ची हेल्दी सुरुवात; लगेच नोट झटपट बनणाऱ्या कोशिंबीरीची सोपी रेसिपी

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)