Navratna Pulao Recipe In Marathi: आपल्याकडे प्रत्येक सणाला एक विशेष मेन्यू ठरलेला असतो. पण एरवी पोळी- भाजीच्या जेवणाने कंटाळा येतो, हो ना? बाहेरचं खायचं म्हंटल की आरामात शे- पाचशेची खिश्याला फोडणी पडणार परत वजन वाढणार ते वेगळं. आता आज होळी पार पडल्यावर आता मध्ये दहा दिवस कोणताही सण नाही. अशावेळी तुम्हाला काही वेगळं खावंसं वाटलं तर त्यासाठी आम्ही एक मस्त रेसिपी घेऊन आलो आहोत. लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील नवरत्न पुलाव बनवून तुम्ही तुमच्या जिभेला एक मस्त सरप्राईज देऊ शकता. विशेष म्हणजे यातील पुदिना, चेरी, अननस यासारखे पदार्थ हे उन्हाळ्यात तुमच्या शरीराला गारवा देण्यासाठी बेस्ट आहेत, त्यामुळे उन्हाळा वाढत असताना ही रेसिपी मध्येच एकदा ट्राय करायला विसरू नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरत्न पुलाव साहित्य:

५०० ग्रॅम बासमती तांदूळ, ५० ग्रॅम पनीर, ५० ग्रॅम मटार, ५० ग्रॅम फ्लॉवर, ५० ग्रॅम चेरी, ५० ग्रॅम अननस, ६० ग्रॅम गाजर, २५ ग्रॅम काजू, २० ग्रॅम मनुका, १५० ग्रॅम दही, १० ग्रॅम गरम मसाला, ३५ ग्रॅम हिरव्या मिरच्या, ७५ ग्रॅम कांदा, १ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, ७५ ग्रॅम तूप किंवा लोणी, १ कप पुदिन्याची पाने, १ कप कोथिंबीर, मीठ चवीनुसार, १ लिंबू, २५ ग्रॅम आलं- लसूण पेस्ट

नवरत्न पुलाव कृती:

१) तांदूळ धुवून पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा जेणेकरून भात शिजवताना चिकट होणार नाही.
२) गाजर व पनीर शॅलो फ्राय करून घ्या.
३) एका पातेल्यात तूप घालून त्यात तपकिरी होईपर्यंत कांडताळून घ्यावे. यात आलं- लसूण पेस्ट, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, पनीर, भाज्या आणि सुका मेवा घालून ५ ते ६ मिनिट फ्राय करा.
४) आता यात गरम मसाला, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, दही घालून थोडा वेळ परतून घ्या. मसाले शिजू द्या. मसाले आणि तेल वेगळे झाल्यावर गॅसची आच बंद करा.
५) दुसरीकडे एका पातेल्यात भिजवून ठेवलेला तांदूळ ८० टक्के शिजवून घ्या. भातात आपण आता तयार केलेला पूर्ण मसाला व भाज्या घालुन नीट मिक्स करा. यावरून लिंबाचा रस, चेरी व अननसाचे तुकडे घालून सजवून सर्व्ह करा.

हे ही वाचा<< Video: भाताचा लगदाही नको,कच्चाही नको! मोकळा फडफडीत भात बनवायच्या ‘या’ १० बेस्ट टिप्स पाहा

ही रेसिपी ट्राय केल्यावर कशी होते ते आम्हाला कळवायला विसरु नका!

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratna pulao marathi recipe for summer how to make non sticky rice in kadhai read loksatta recipes svs
First published on: 07-03-2023 at 17:33 IST