आपल्या सगळ्यांनाच मासे खायला खुप आवडतात. त्यातून आपण नेहमी हाच विचार करतो की कधी एकदा माश्यांचा सिझन येतोय आणि आपण गरमागरम भाजलेले, तळलेले मासे कधी खातोय. तेव्हा मासे खाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच तोंडाल पाणी सुटलेलं असते. त्यातल्या त्यात सगळ्या माशांमध्ये पापलेट मासा हा सगळ्यांचा फेव्हरेट, आज आम्ही तुमच्यासाठी याच पापलेटची रेसिपी घेऊन आलो आहोत. मात्र हे पापलेट आपण केळीच्या पानात बनवणार आहोत. चला तर पाहुयात कसे बनवायचे केळीच्या पानातले पापलेट फ्राय..

केळीच्या पानातील पापलेट साहित्य

  • पापलेट १५० ग्रॅम (साधारणपणे २ मध्यम आकाराचे स्वच्छ केलेले तुकडे)
  • खोबरे २ मोठे चमचे (बारीक केलेले ओले खोबरे)
  • कोथिंबीर, पुदिना चिरून २-३ मेथ्यांच्या दाण्यांची पावडर
  • मीठ, हिरवी मिरची, लिंबू रस
  • केळीचे पान एक, बटर दोन चमचे

केळ्याच्या पानातील पापलेट साहित्य कृती –

पापलेट माशाचे तुकडे (काटे काढून, स्वच्छ करून) घ्या. तुकड्यावर सुरीने उभ्या ओळी आखाव्या जेणेकरून मसाला आत भरला जाईल. एका भांड्यात माशांच्या तुकड्यांना मीठ आणि लिंबूरस लावून १० मिनिटे झाकून ठेवा. दुसऱ्या भांड्यात पुदिना, कोथिबीर, आल-लसूणाची पेस्ट, मेथ्यांची पावडर, मीठ, हिरवी मिरची एकत्रित करून ते मिक्सरमध्ये वाटून आतून-बाहेरून व्यवस्थित लावा. जेणेकरून हिरव्या रंगाचे माशांच्या तुकड्यावर आवरण होईल. १ केळीचे पान घ्या, त्याला बटर हाताने लावून पसरवा. त्यात मिश्रण लावलेले माशाचे तुकडे ठेवून पानात दुमडून घडी करून घ्या. हे केळीच्या पानातले तुकडे मोदक पात्रात शिजवून घ्या. शिजल्यावर केळीची पाने उलगडून माशांचा आस्वाद घ्या.

हेही वाचा – Viral video: वाघासोबत तरुणीचं फोटोशूट, सुरुवातीला शांत बसला काही क्षणातच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप – केळीची पाने पात्रात सुटू नये म्हणून पानाच्या उभ्या- निमुळत्या लांब तुकड्याने बांधून घ्या. पापलेट प्रमाणे सूरमयी, राव, रोहू असे इतर माशांचे प्रकार वापरू शकता. या कृतीसाठी ताजे मासे वापरा. खारवलेले, फ्रोझन् मासे वापरू नयेत. मॅकोबायोटिक डाएट पद्धतीमध्ये ताजे आणि स्थानिक माशांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.)