वाघ बिबट्या आणि चिता खतरनाक शिकारीसाठी ओळखला जातो. या तीन प्राण्यांची जंगलात इतकी दहशत आहे, मोठे-मोठे प्राणी त्यांच्यापासून लांब राहणं पसंत करतात. प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गलामध्ये अनेक भयानक प्राणी राहतात आणि कोण कधी हल्ला करेल याचा काही नेम नाही. जंगलातील भयंकर शिकारी अशक्त प्राण्यांना आपली शिकार बनवून आपलं पोट भरत असतात. यापैकी सिंह, वाघ, बिबट्या अव्वल शिकारी आहेत. त्यांना बघून इतर प्राणीही दूर पळतात, माणसांचं तर अशा प्राण्यांपासून चार हात लांब राहतात. मात्र सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी चक्क वाघासोबत फोटोशूट करतेय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी पोज देऊन फोटो काढण्यासाठी गार्डनमध्ये झोपली आहे. तेवढ्यात पाठून वाघ येतो आणि तिच्या खांद्यावर दोन्ही पाय ठेवतो. वाघ तरुणीच्या अंगावर आरामात बसलेला दिसतो. वाघ समोर येताच कोणचााही थरकाप उडतो आणि लोक जीव मुठीत घेऊन धावत सुटतात, तिथे ती तरुणी मात्र आरामात पडून फोटो काढताना दिसते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: सौंदर्य स्पर्धेत बायकोचा दुसरा क्रमांक! पती संतापला, थेट मंचावर गेला अन्…
हा व्हिडीओ आणि फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसतायेत. दोन्ही पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटचाही वर्षाव होताना दिसतोय.