पोहे व कुरमुऱ्याचे झटपट मसाला घावन बनवून दिवस करा सुरु; पोटही भरेल वेळही वाचेल, ही घ्या रेसिपी

Indian Breakfast Recipe: आज आपण अशो रेसिपी पाहणार आहोत ज्यासाठी तुम्हाला फार विशेष पूर्व तयारी करावी लागणार नाही. चला तर मग बघूया पोहे व चुरमुर्यांचे झटपट मसाला घावन कसे बनवायचे…

Quick Indian Breakfast Recipe Poha and Rice Masala Ghavan Dosa Marathi Kitchen tips To Fill Hungry Belly
पोहे व कुरमुऱ्याचे झटपट मसाला घावन (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Quick Indian Breakfast Recipe: सकाळी उठल्यावर आपल्यालाही खूप भूक लागत असेल. अशावेळी तात्पुरती भूक भागवण्यासाठी काही जणचहा – कॉफी घेतात पण अशाने भुक तर मातेचं पण वर ऍसिडिटी सुद्धा वाढू शकते. हीच गोष्ट संध्याकाळी सुद्धा घडण्याची शक्यता असते. विशेषतः काम उरकून जेवणाच्या मध्ये असणाऱ्या फावल्या वेळेत खुप कडाडून भूक लागते, काही खाल्लं तर जेवण जाणार नाही आणि नाही खाल्लं तर राहवणार नाही अशी स्थिती होऊन बसते. अशावेळी तुम्ही चटकन बनवू शकता अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. घावन हा कोकणातला हिट पदार्थ आहे. पण आज आपण अशो रेसिपी पाहणार आहोत ज्यासाठी तुम्हाला फार विशेष पूर्व तयारी करावी लागणार नाही. चला तर मग बघूया पोहे व चुरमुर्यांचे झटपट मसाला घावन कसे बनवायचे…

झटपट मसाला घावन रेसिपी साहित्य

प्रत्येकी एक वाटी पोहे, चुरमुरे, चमचाभर दही, १ कांदा, १ चमचाभर साखर, चिमूटभर सोडा, तेल, जिरे, अर्धी वाटी वाटलेली डाळ, आवडणीसार भाजी (गाजर, कॉर्न, मटार) मिरच्या, बटर, चीज

झटपट मसाला घावन कृती

पोहे व चुरमुरे मिक्सरमधून वाटून घ्या व त्यात वाटलेली डाळ घालून पुन्हा एकदा मिक्सरला लावून घ्या. संपूर्ण त्यात चमचाभर दही, पुरेसे पाणी, मीठ, साखर घालून मिश्रण थोड्यावेळ तसेच राहूद्या. कढईत चांचभर तेल तापवून त्यात जिरे, हिंग, मिरचीचे बारीक तुकडे, आले किसून घाला. कांदा व कडीपत्ता घालून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. यामध्ये मग गाजराचा किस व भाज्या घालू शकता. शक्य तेवढे बारीक तुकडे करा जेणेकरून घावन नंतर फाटणार नाही. तवा गरम करून मग त्यावर तेलाचा व मग मिठाच्या पाण्याचा बोळा फिरवून घ्या, मग पीठ तव्यावर पसरून गोल घावन घालावे. वाढताना बटर किंवा चीज घालून सर्व्ह करू शकता. चटणी किंवा सॉससह हे घावन खाऊ शकता.

Video: १५ मिनिटात तयार करा पोह्याचा जाळीदार दावणगिरी डोसा; पीठ आंबवण्याची कटकटच नाही

ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून पहा व कशी होते नक्की कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:10 IST
Next Story
१० सेकंदात अननस कापण्यासाठी पठ्ठ्याने लढवली शक्कल; Video पाहून म्हणाल, “इंटरनेटचे पैसे कामी आले”
Exit mobile version