नवरात्रीची आज तिसरी माळ आहे, यादरम्यान काही जण केवळ फलाहार करणं पसंत करतात तर काही वेगवेगळ्या फराळाचा आस्वाद घेतात. नवरात्रीच्या उपवासासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आजची रेसिपी आहे. उपवासाचे रताळ्याचे कटलेट, चला तर जाणून घेऊयात याची रेसिपी.. उपवासाचे रताळ्याचे कटलेट साहित्य - १/२ किलो रताळी२ टेबलस्पून हिरव्या मीरचीचा ठेचा२ टेबलस्पून आल्याचा ठेचा२ टेबलस्पून साबुदाणा पीठ२ टेबलस्पून वरीच्या तांदळाचे पीठ१/४ कप शेंगदाण्याचे कुट१ टेबलस्पून मीठ१ टेबलस्पून सैंधव मीठ१ टेबलस्पून जीरे२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर१/४ टेबलस्पून पांढरी मिरपूड१ टेबलस्पून तिखट१/२ लिंबाचा रस उपवासाचे रताळ्याचे कटलेट कृती स्टेप १प्रथम रताळी स्वच्छ धुवून ५ मिनीटे पाण्यात उकडून घ्यावीत. उकडलेली रताळी किसून घ्यावी. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.स्टेप २एका भांड्यात रताळ्याचा कीस घालावा. त्यात मीरचीचा व आल्याचा ठेचा घालावा.स्टेप ३त्यात तिखट, मिरपूड व मीठ घालावे.स्टेप ४जीरे, सैंधव मीठ व शेंगदाणा कूट घालावे.स्टेप ५त्यात साबुदाणा पीठ, वरीचे पीठ व कोथिंबीर घालावी.स्टेप ६लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावे. ह्या मिश्रणाचे हवे त्या आकाराचे कटलेट तयार करून घ्यावेत.स्टेप ७गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात एक-एक करून कटलेट सोडावे व लालसर रंगावर तळून घ्यावेत. तळलेले कटलेट टिश्यू पेपरवर काढून ठेवावे. हेही वाचा >> घरीच बनवा पाव किलोच्या अचूक प्रमाणात “गरम मसाला”; जाणून घ्या सोपी मराठी पद्धत स्टेप ८तयार कटलेट डीश मध्ये काढून हिरव्या चटणी बरोबर खायला द्यावे.