Shev Paratha Recipe in marathi: शाळा असल्यावर आईला मुलांच्या डब्याचं टेन्शन येतं. रोज-रोज आपल्या मुलांच्या टीफीन बॉक्समध्ये काय द्यायचं जे हेल्दी असेल आणि टेस्टी असेल. आवडीचा खाऊ डब्यात नसेल तर, मुलं डब्बा खात नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांची आवडही सुपरमॉमला लक्षात घ्यावी लागते. मुलांचा शाळेचा डबा तयार करताना त्यांच्या आरोग्याचा आणि आरोग्यासाठी लागणा-या पोषक घटकांचाही विचार करा. मुलांच्या आरोग्यासाठी काय उपयुक्त आहे, काय नाही याचा विचार करून डबा बनवला, तर मुलांचे आरोग्य उत्तम राहते. चला तर मग घरी असलेली मसाला शेव किंवा भुजियापासून तुम्ही टेस्टी पराठा बनवून खाऊ शकता. याची चव अप्रतिम आहे आणि तुम्ही ते दह्यासोबत खाऊ शकता. मुलांनाही हा पराठा खूप आवडेल. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता. हा पराठा कसा बनवायचा ते जाणून घ्या.

शेव पराठा साहित्य

कांदा बारीक चिरून – १

हिरवी मिरची चिरलेली – १ टीस्पून

हिरवी कोथिंबीर चिरलेली – २ चमचे

गरम मसाला – १/२ टीस्पून

आमचूर पावडर – १/४ टीस्पून

जिरे पावडर – १ टीस्पून

तेल – आवश्यकतेनुसार

मीठ – चवीनुसार

शेव पराठा कृती

१. शेव पराठा बनवण्यासाठी प्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात एक चमचा तेल आणि चिमूटभर मीठ घालून चांगले मिक्स करा.

२. आता थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर पीठ झाकून ठेवा आणि थोडा वेळ बाजूला ठेवा.

३. दरम्यान, कांदा, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आता दुसरा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात शेव, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा.

४. यानंतर त्यात जिरेपूड, गरम मसाला, आमचूर पावडर आणि थोडे मीठ घालून चांगले मिक्स करून सारण तयार करा.

हेही वाचा >> थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर अशी सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. यानंतर पीठ घेऊन पुन्हा एकदा मळून घ्या. यानंतर, समान प्रमाणात मध्यम बाजूचे गोळे करा.