रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते. तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल चमचमीत झणझणीत आगरी पद्धतीची नॉनव्हेज रेसिपी घेऊन आलो आहोत. चिंबोरीचं कालवण बनवून जीभेला द्या झकास ट्रिट चला तर मग पाहुयात, कसं बनवायचं चिंबोरीचं कालवण..

चिंबोरीचं कालवण साहित्य –

  • चिंबोऱ्या स्वच्छ करुन घ्या
  • कांदे दोन बारीक चिरलेले, हिरवे वाटण पाव वाटी
  • काळी मिरी पूड अर्धा चमचा, तळलेला मसाला एक वाटी
  • चिंचेचा कोळ अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे
  • सी.के.पी मसाला दोन-तीन चमचे
  • हळद अर्धा चमचा, तेल अर्धी वाटी

चिंबोरीचं कालवण कृती –

प्रथम चिंबोरीच्या नांग्या आणि पाय तोडून घ्या. चिंबोरी स्वच्छ धुवा आणि अलगद मध्ये फोडून पाठ आणि पेंदा वेगळा करुन आतली लाख काढून घ्या. पाठीचे कवच टाकून घ्या. मोठ्या पातेल्यात तेल गरम करुन त्यावर हिंग घाला लगेच कांदा घालून परता. कांदा गुलाबी झाल्यावर हळद, मीठ, मिरी पावडर आणि हिरवे वाटण घालून परतून घ्या. लगेच त्यावर लाख घालून तेल सुटेपर्यंत परता. त्यावर तिखट घालून वर चिंबोरीचे पेंदे घाला. चांगले परता नंतर सर्व नांगे घालून परता. नांग्यांचा रंग लाल होईल. नंतर त्यात गरम पाणी घाला आणि उकळी आणा. पातेल्यावर झाकण ठेवून चिंबोरी नीट शिजू द्या. चिंबोरीचे चपटे पाय आणि काही लहान पाय मिक्सरमध्ये पणी घालून वाटून घ्या. हे पाणी गाळून चिंबोरी शिजल्यावर घाला तसेच तळलेला मसाला आणि चिंचेचा कोळ घाला. १५-२० मिनिटे कालवण चांगले उकळू द्यावे. गरज पडल्यास आणखी पाणी घाला. जितके जास्त उकळाल तेवढी चांगली चव येते.

Pomfret Che Sukka Recipe In Marathi Pomfret Recipe malavani style recipe
चमचमीत आणि चविष्ठ पापलेट सुक्का; अस्सल मालवणी बेत नक्की ट्राय करा
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा