जेवणाचा मेनू साधा असू देत किंवा स्पेशल सोबत कुरकुरीत पापड असले की जेवणास मजा येतेच. केवळ जेवणासोबतच नाहीतर मधल्या भुकेसाठी कुरकुरीत खाऊ म्हणून पापड उपयोगी पडतात. म्हणूनच उन्हाळ्यात आवर्जून वडे, पापड, कुरडया केल्या जातात. घरी करायला जमलं नाही तर बाहेरुन आणून वाळवणाच्या साहित्यांनी डबे भरले जातात. कुरकुरीत आणि खमग चवीच्या पदार्थासाठीची धावपळ ही कोण्याही भारतीय स्त्रीसाठी नवीन नाही. अशातच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, तांदळाच्या पिठाचे खिच्चे पापड. आता १ किलो रेशनचा तांदुळ वापरून बनवा २०० खिचे पापड, चला तर बघुया रेसिपी.

तांदळाचे पापड साहित्य –

  • १ कप तांदूळ
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा चिल्ली फ्लेक्स
  • तांदळाचे पापड तळून घेण्यासाठी तेल

तांदळाचे पापड कृती –

  • १ कप तांदूळ ३ ४ वेळा पाण्यामध्ये धुवून घ्या
  • धुवून झालयावर १ कप पाणी टाकून २४ तासांसाठी झाकून ठेवा
  • मिक्सर मधून तांदुळचे पीठ बारीक करून बॅटर बनवून घ्या
  • मिक्सर मधून काढलेले बॅटर चाळणीने चालून घ्यायचे आहे
  • मीठ , जिरे , चिल्ली फ्लेक्स टाकून घ्या
  • मिक्स करून तांदळाचे पीठ १० मिनिटे ठेवा
  • स्टीम करून काढलेले पापड सुकवून घ्या
  • तेल मध्ये तळून घ्या

हेही वाचा – उन्हाळ्यात बनवा आणि वर्षभर खात रहा! सोप्पी साबुदाणा चकली, एक खास ट्रिक वापरून बनवा तिप्पट फुलणारी खुसखुशीत चकली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व पापड झाल्यानंतर छान डब्यात भरून ठेवा, आणि वर्षभर खा. ही रेसीपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी होते ते आम्हाला कळवा.