साबुदाणा चकली हा उन्हाळ्यात उपवासाच्या वेळी खाल्ला जाणारा खास पदार्थ आहे. जर तुम्हाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा इत्यादी फराळाच्या इतर सर्व पाककृती खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही बटाटा आणि साबुदाणा चकली करून पाहू शकता. साबुदाणा चकलीला गुजरातीमध्ये चकरी असेही म्हणतात.लहान मुले असो वा मोठे प्रत्येकजण कधीही खाऊ शकतो कारण ते वर्षभर साठवले जाऊ शकते. तसेच, ही चकली घरी बनवणे खूप सोपे आहे, चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची साबुदाणा चकली.

साबुदाणा चकली साहित्य –

  • १ किलो साबुदाणा
  • १ किलो बटाटे
  • १४-१५ हिरवी मिरची
  • २ टेबललस्पुन जिर
  • चवीनुसार मीठ

साबुदाणा चकली कृती –

  • चकली बनवण्यासाठी आधी साबुदाणा धुऊन रात्री भिजवावा. नंतर बटाटे उकळवा आणि बारीक खवणीने किसून घ्या. आता एका भांड्यात १ ते २ कप पाणी आणि मीठ टाकून गरम करा. नंतर त्यात भिजवलेला साबुदाणा घालून मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवा.
  • हे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. नंतर त्यात किसलेले बटाटे टाका.नंतर लाल तिखट, जिरे आणि चवीनुसार मीठ इत्यादी सर्व साहित्य टाकून सर्व साहित्य चांगले मिसळा.
  • आता चकलीच्या साच्याला तेलाने ग्रीस करा. नंतर बटाटा आणि साबुदाणा मिश्रण साच्यात घाला. नंतर तेल लावलेल्या प्लास्टिकच्या आसनावर चकलीला गोल आकार द्या. उन्हात वाळवा, आता कढईत तेल गरम करून चकल्या मध्यम आचेवर तळून घ्या. अशाप्रकारे आपली साबुदाणा चकली रेडी आहे.

हेही वाचा – Summer drink: उन्हाळा सुरु झालाय ट्राय करा मसाला ताक, वजन कमी करण्यासाठीही होईल मदत

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
how to make thick cold coffee with ice cream
फक्त १० मिनिटांत बनवा कॅफेसारखी फेसाळ Cold coffee! गाळण्याचा ‘असा’ वापर करून पाहा
  • आता गरमागरम चहासोबत सर्व्ह करा. तसेच, तुम्ही उपवासाच्या वेळी देखील ते घेऊ शकता. उरलेली चकली तुम्ही डब्यात जास्त काळ साठवून ठेवू शकता.