Undhiyu Recipe In Marathi: भारत हा खवय्यांचा देश म्हणून ओळखला जातो. राज्याच्या, प्रांताच्या सीमा ओलांडून आपल्याकडे खाण्यावर प्रेम केले जाते. म्हणूनच तर मुंबईचा वडापाव अख्ख्या देशात प्रसिद्ध आहे. गुजरातचा जलेबी फाफडा, पश्चिम बंगालच्या मिठाईचे फॅन्स देशभर आहेत. अशीच एक प्रसिद्ध गुजराती रेसिपी म्हणजे उंधियु. प्रसिद्ध हिंदी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये दया- जेठालालच्या तोंडी अनेकदा आपण हे नाव ऐकलं असेल पण ही रेसिपी नेमकी कशी बनवायची हे माहीत आहे का? उंधियु म्हणजे काहीसा मिक्स व्हेज सारखा प्रकार अशी एक साधारण ओळख आपल्याला माहित असेल पण मुळात उंधियुमध्ये अनेक गोष्टी असतात. कदाचित म्हणूनच नेमकं काय व किती सामान उंधियुमध्ये वापरायचं हा गोंधळ होऊ शकतो. यावर उपाय म्हणून आज आपण लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून उंधियुची मराठी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग..

उंधियु साहित्य

१- १ वाटी सुरती पापडी, वाल पापडी, कच्ची केली, लहान बटाटे, काली लहान वांगी, १ रताळं, मेथीची पाने अर्धा वाटी, १ वाटी बेसन, २ मोठे चमचे कणिक, २ मोठे चमचे तेल, अर्धी वाटी खोबरं, बारीक चिरलेल्या हिरव्या लसणाची पात, धणे-जिरे पूड, तिखट, हळद, हिंग, ओवा,साखर, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ व लिंबाचा रस

उंधियु कृती

मेथीच्या पानांमध्ये बेसन, कणिक, हळद, तिखट, स्वादानुसार मीठ- साखर, आलं व मिरचीची पेस्ट, आणि मोहनासाठी तेल घालून घ्या. हलक्या पाण्याच्या हाताने हा गोळा नीट मळून घ्या व याचे छोटे मुटुकले तयार करा. हे तयार मुठिया तेलात तळून घ्या. आता खोबरे, तीळ, शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर , लसूण, धणे पूड, तिखट, साखर, लिंबाचा रस एकत्र करून एक मसाला तयार करून घ्या. छोट्या वांग्यांना उभी- आडवी चीर देऊन त्यात हे सारण भरा. भाज्यांचे मोठे तुकडे करून घ्या. तेल गरम करून यात ओवा, हिंग, वाल- सुरती पापडी परतवून घ्या. उर्वरित मसाला, धणे पूड घालून मग मसाला थोडा शिजू द्या. यावरून वांगी व तळलेले मेथी मुठिया टाकून घ्या. यावर थोडं पाणी शिंपडून मग काहीवेळ मंद आचेवर शिजू द्या. गरमागरम पुई किंवा रोटीसह हा उंधियु सर्व्ह करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा<< खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढते ‘ही’ चटपटीत चटणी; चला बघूया आहारतज्ज्ञांची सोपी रेसिपी

उंधियु बनवायला नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडा वेळ कदाचित जास्त लागेल पण जेव्हा तुम्ही ही चव चाखाल तेव्हा सगळं काही सार्थकी लागल्याचा फील येईल हे नक्की. तसाही आता वीकएंड आहे तर तुमच्या वेळेचाही सदुपयोग करा आणि जिभेलाही मदत ट्रीट द्या. काय मग ट्राय करून बघताय ना?