थंडीच्या दिवसांत गरमागरम सूप प्यायला कोणाला आवडत नाही ? टोमॅटो सूपबद्दल बोलायचे झाले तर ते केवळ चविष्टच नसते तर ते प्यायल्याने लहान मुलं आणि मोठ्या व्यक्तींनाही आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. टोमॅटो सूपमध्ये व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई अशी जीवनसत्वे तसेच फायबर, खनिजे आणि फायदेशीर अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. टोमॅटो सूप तयार करणंही अतिशय सोपं असतं. चला तर मग याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

टोमॅटो सूप साहित्य –

टोमॅटो
कोथिंबीर पाने – १/२ कप
चिरलेली कोथिंबीर – १ टेस्पून
तूप – २ चमचे
काळी वेलची – १
छोटी वेलची – २
जिरे – ½ टीस्पून
बडीशेप – ½ टीस्पून
दालचिनी – १ लहान तुकडा
काळी मिरी – ५-६
सुकी लाल मिरची – १-२
मीठ – चवीनुसार
लाल मिर्च पाउडर – १/२ टीस्पून

टोमॅटो सूप कृती

प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात काळी वेलची, छोटी वेलची, जिरे, बडीशेप, दालचिनी, काळी मिरी आणि कोरडी लाल मिरची घालून सुवासिक होईपर्यंत तळा.

आता टोमॅटोचे चार तुकडे करून त्यात घाला. नंतर त्यात कोथिंबीर, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करा.
आता २ वाट्या पाणी घालून ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी

कुकरचा प्रेशर सुटल्यावर तो उघडा आणि टोमॅटोचे मिश्रण हँड ब्लेंडरने ब्लेंड करा. जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही ते मिक्सरमध्येही ब्लेंड करू शकता. आता ते गाळून कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.