महाराष्ट्रात वारकर्यांसह विठू माऊलीच्या भक्तांसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे मोठे महत्त्वाचे सोहळे आहे. आषाढीला पंढरपुरात जाऊ शकले नाही तरी अनेकजण घरात एकादशीचे व्रत करून विठू माऊलीकडे प्रार्थना करतात. मग यंदा तुम्ही देखील आषाढी एकादशीचं व्रत करणार असाल तर जाणून घ्या या उपवासानिमित्त तुम्ही घरच्या घरी कोणते खास पदार्थ बनवून एकादशीचं व्रत पाळू शकता. सर्वसाधारण नियमांप्रमाणे, एकादशीचा उपवास करणारा व्यक्ती व्रतादरम्यान केवळ फलाहार आणि दूध पिऊ शकतो. परंतू तुम्हांला ते शक्य नसेल तर या व्रताच्या निमित्त तुम्ही घरच्या घरी काही उपवासाचे पदार्थ बनवू शकता. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आज उपवासाची एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात रताळ्याचा कीस कसा करायचा
रताळ्याचा कीस साहित्य :
- रताळी २ मोठी, शेंगदाण्याचा जाडसर कूट १ वाटी
- ओलं खोबरं, १/२ वाटी, साजूक तूप १/४ वाटी
- हिरवी मिरची ५-६ बारीक चिरलेली
- जिरे १ चमचा
रताळ्याचा कीस कृती
- प्रथम रताळी स्वच्छ धुऊन सालासकट किसून पाण्यात ठेवा. कढईत तूप आणि जिरं टाका. जिरे तडतडल्यावर मिरची घाला. त्यावर पाण्यात किसून ठेवलेली रताळी पिळून घाला आणि परता. त्यावर मीठ, साखर घालून शिजवून घ्या.
- वाफ आल्यावर त्यात दाण्याचा कूट, खोबरं घालून नीट एकत्र करा आणि परत वाफ आणा. टीप : रताळ्याचे सत्त्व पाण्यातून रताळ्याचा कीस काढल्यावर पाणी तसेच १-२ तास ठेवा.
- रताळ्याचे सत्त्व तसेच खाली बसेल. वरचं पाणी काढून टाका आणि सत्त्व काढून घ्या. १ वाटी सत्त्वाला २ वाटय़ा दूध आणि चवीप्रमाणे साखर घालून १/२ चमचा वेलची पावडर घालून गॅसवर गरम करत ठेवा. सतत ढवळत राहा.
- घट्ट झाल्यावर एका थाळीत काढून पसरून घ्या आणि थंड झाल्यावर वडय़ा पाडा. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.
हेही वाचा – चवळीचे कुरकुरीत कटलेट, संध्याकाळच्या नाश्ता होईल एकदम टेस्टी, ही घ्या सोपी रेसिपी
हे पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर उपवास नसेल तरी, खाऊ शकता.