How To Make Masala Idli : इडली हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. एखादी विशिष्ट पिपाणी वाजवत सकाळी इडली विकणारा चाळीत आलेला एकदा तरी तुम्ही पाहिला असेल.आपल्यातील बरेचजण सुट्टीच्या दिवशी किंवा ऑफिसला जाण्याआधी इडली खाऊनच दिवसाची सुरुवात करतात. इडली चिली, रवा इडली, पोहा इडली आदी अनेक प्रकार तुम्ही इडलीचे खाल्ले असतील. पण, आज व्हायरल व्हिडीओत एक अनोखी ‘मसाला इडलीची’ रेसिपी बघायला मिळाली आहे; जी तुम्हालाही नक्कीच आवडेल.
साहित्य –
- १/२ कप मूग डाळ (धुऊन भिजवलेले)
- १ हिरवी मिरची
- आल्याचे काही तुकडे
- मीठ आणि गुलाबी मीठ
- २ बर्फाचे तुकडे
- १/२ चमचा इनो
- १ चिरलेला कांदा
- ५ ते ६ पाकळ्या लसूण
- १ हिरवी मिरची
- २ चिरलेला टोमॅटो
- १/२ चमचा हळद पावडर
- १ चमचा मिरची पावडर
- १ चमचा जिरे पावडर
- १ चमचा धणे पावडर
- १ चमचा पावभाजी मसाला
- मुठभर धणे
कृती –
- इडलीचे बॅटर (पीठ) बनवण्यासाठी धुवून आणि भिजवून घेतलेली मूग डाळ, आलं, हिरवी मिरची, मीठ आणि गुलाबी मीठ, दोन बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- तयार पिठात इनो टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- त्यानंतर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एका भांडयात पिठापासून छोट्या आकाराच्या इडल्या बनवून घ्या.
- ५ ते ६ मिनिटे ठेवून शिजवून द्या.
- थंड झालं की, इडली एका ताटात काढून घ्या.
- नंतर कढईत बटर टाका. मग त्यात जिरे, चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, पावभाजी मसाला, हळद, मिरची पावडर, धणे पावडर घालून थोडा वेळ शिजू द्या.
- टोमॅटो शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर घाला आणि मग तयार छोट्या इडल्या त्या मिश्रणात टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या.
- अशाप्रकारे तुमची छोटी इडली तयार.
व्हिडीओ नक्की बघा…
खास टिप्स –
बॅटरमध्ये इनो घालण्यापूर्वी स्टीमर गरम करावे.
छोट्या इडली सुमारे २ ते ३ मिनिटे थंड करून बाहेर काढाव्यात.
कांद्याच्या टोमॅटो बेसमध्ये थोडेसे पाणी घातल्याने इडली ओल्या होतात.
त्याचबरोबर तुम्ही मसाला इडलीच्या बॅटरमध्ये थोडा भात आणि काही भाज्या घालून जास्त फायबर मिळवू शकता.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nehadeepakshah या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.