शरीराला बळकटी आणि आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी आपण रोजच्या आहारात भात, पोळी, भाजी, सॅलड, डाळींचा समावेश करतो. पण या सकस आहारात आता तुम्ही नाचणीच्या पदार्थांचाही समावेश करु शकता. कारण नाचणीच्या पदार्थांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नाचणीत चांगले गुणधर्म असल्याने ते लहान मुलांपासून ज्येष्ठ लोकांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.

शरीरला नेहमीच आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शियम आणि फॉस्फरस नाचणीत मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्याबरोबरच हाडांनाही मजबूती मिळते. आता तुम्ही जराही वेळ न घालवता नाचणीची इडली कशी बनवायची, त्याची रेसिपी नीट समजून घ्या आणि रोजच्या आहारात नाचणीच्या इडलीचा समावेश करायला विसरु नका.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

नक्की वाचा – चहाची तलफ पुन्हा येईल, कारण ज्वारीच्या बिस्किटांची खासीयतच वेगळी, झटपट रेसिपी एकदा पाहाच

नाचणीची इडली

साहित्य – नाचणीचा रवा १ वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी, मेथीदाणे १ चमचा, मीठ आवश्यकतेनुसार

कृती – नाचणी, मेथीदाणे आणि उडदाची डाळ ४ तासांसाठी वेगवेगळ्या पाण्यात भिजत घाला. नंतर ते एकत्र करुन इडलीच्या पिठाप्रमाणे जाडसर वाटून घ्या. त्यामध्ये मीठ घालून चांगले एकत्र करुन घ्या आणि ते रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पीठ इडली पात्रात घालून १०-१५ मिनिटं इडल्या वाफवून घ्या.