फिक्शन१) पेपर टाऊन्स : जॉन ग्रीन, पाने : २८०३९९ रुपये.‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या कादंबरीमुळे जगभर चर्चेत आलेल्या जॉन ग्रीनची ही नवी कादंबरी भारतात पेपरबॅक स्वरूपात उपलब्ध झाली आहे. २) गॉड इज गेमर : रवि सुब्रमणियन, पाने : ३२४२९९ रुपये.(आयआयटी किंवा) आयआयएममधून पासआऊट झालेल्या आणि साहित्यक्षेत्रात नाव कमावलेल्या लेखकांपैकी हे एक प्रमुख नाव. रवि यांनी रहस्य कादंबरीकार म्हणून नाव मिळवले आहे. ही त्यांची नवी रहस्मय कादंबरी वाचनीय वाटावी.३) द डेलिब्रेट सिनर : भावना अरोरा, पाने : १६५१२० रुपये.सैनिकी पाश्र्वभूमीतून आलेल्या आणि जगभर प्रवास करणाऱ्या तरुण लेखिकेची ही प्रणयरम्य कादंबरी आहे. मराठीतल्या फडके-खांडेकर यांची शिष्या शोभेल अशा पद्धतीची ही कादंबरी आजच्या रीतीने व्यक्त होते, एवढाच काय तो फरक म्हणायचा.नॉन-फिक्शन१) नॉट जस्ट अॅन अकाउटंट : विनोद राय, पाने : २८८५०० रुपये.माजी महालेखापरीक्षक राय यांचे हे पुस्तक म्हणजे संजय बारुआ, सी. परख, नटरवरसिंग यांच्यानंतर काँग्रेस पक्षावर पडलेला आणखी एक बुक-बॉम्ब, असे या पुस्तकाचे वर्णन ते प्रकाशित होण्याच्या आधीच करण्यात आले. यातच सर्व काही आले.२) क्लिअर होल्ड बिल्ड- हार्ड लेसन्स ऑफ बिझनेस अँड ह्य़ूमन राइटस इन इंडिया : सुदिप चक्रवर्ती, पाने : ३२०३७० रुपये. हे पुस्तक भारतातील मानवी हक्कांची पायमल्ली केंद्र-राज्य सरकार, व्यावसायिक आणि काही हितसंबंधी गटांकडून कशा प्रकारे केली जाते यावर भगभगीत प्रकाश टाकते. लेखकाच्या अभ्यास-संशोधन आणि मेहनतीतून भारताचे वास्तवचित्र समोर उभे राहते.३) मालविकाग्निमित्रम् - द डान्सर अँड द किंग : कालिदास, पाने : १७६३९९ रुपये.कालिदासाच्या नाटकाचे हे एक नवे इंग्रजी भाषांतर. हे नाटक ज्यांनी मूळ संस्कृतमधून वा इतर भाषेतून वाचले असेल त्यांना यात काहीही नवे मिळणार नाही.