१) अंगारे : सज्जाद ज़्ाहीर, अहमद अली, राशीद जहाँ, महमूद जफ़र, पाने : १४४१९५ रुपये.
हा संग्रह स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२ साली बंदी आलेल्या उर्दू लेखकांचा आहे. या संग्रहात नऊ कथा आणि एक नाटक, यांचा समावेश आहे. यातील कथांनी तत्कालीन उर्दू साहित्यात नवे युग सुरू केले, पण परंपरावाद्यांना या कथांमध्ये धर्माची आणि धर्ममान्य व्यक्तिमत्त्वांची टवाळी आवडली नव्हती. आता इतक्या वर्षांनंतर हा संग्रह अनुवादित स्वरूपात उपलब्ध झाला आहे.
२) बुद्धा-अ स्टोरी ऑफ एन्लाइटमेंट : दीपक चोप्रा, पाने : १६०४९५ रुपये.
ही ग्राफिक कादंबरी आहे. यामध्ये सिद्धार्थ गौतमचा एक राजकुमार ते भगवान बुद्ध इथपर्यंतचा प्रवास चित्रमय रीतीने सांगितला आहे. बुद्धाने जगाला दिलेला शांतीचा संदेश आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान यांचा उलगडा चित्रांमधून केलेला असल्याने ही कादंबरी वाचनीय आणि प्रेक्षणीय झाली आहे.
३) द कलेक्टेड वर्क्स ऑफ ए. जे. फिक्री : ग्रॅबिएल झेविन, पाने : २५६३५० रुपये.
शीर्षकावरून हा लेखसंग्रह वाटत असला तरी प्रत्यक्षात ही कादंबरी आहे. युरोप-अमेरिकेत पुस्तकांशी संबंधित विषयांवर रहस्यमय-गूढप्रधान कादंबऱ्या मोठय़ा प्रमाणावर लिहिल्या जातात. ही त्यापैकीच एक वाचनीय कादंबरी आहे.
नॉन-फिक्शन
१) हार्ड चॉइसेस : हिलरी क्लिंटन, पाने : ६५६९९९ रुपये.
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव आणि भावी राष्ट्राध्यक्ष मानल्या जाणाऱ्या हिलरी क्लिंटन यांचे हे आत्मचरित्र. ‘लिव्हिंग हिस्ट्री’ हा त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग २००३ साली प्रकाशित झाला. त्यात बिल क्लिंटन यांच्याबरोबरच्या सहजीवनाची आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणूनचा प्रवास आला आहे. असो. प्रकाशनाआधीपासून प्रस्तुत पुस्तकाची जगभर चर्चा आहे आणि त्यातील काही स्पष्टीकरणांवर विवादही होऊ लागले आहेत.
२) गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया : ए.पी.जे. अब्दुल कलाम, पाने : १६०१९५ रुपये.
डॉ. कलाम राष्ट्रपती झाले नसते तर त्यांचे लेखन कदाचित फारसे बहुचर्चित ठरले नसते. आणि कदाचित त्यांनी भारंभार लिहिलेही नसते. या नव्या पुस्तकात डॉ. कलाम यांनी आपल्यापुढील आव्हानांचा भारत प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यांच्या जोरावर कसा सामना करू शकतो, याविषयी विचार प्रगट केले आहेत. ते मननीय नक्कीच आहेत.
३) द वर्ल्ड कप-द डेफिनेटिव्ह गाइड : निक होल्ट, पाने : ५१२/४९९ रुपये.
फुटबॉल वल्र्डकप सुरू झाले १९३० साली. तेव्हापासून आजपर्यंतचा म्हणजे गेल्या ८४ वर्षांचा इतिहास या पुस्तकात संक्षिप्त स्वरूपात वाचायला मिळतो. खेळाडूंची साररूप चरित्रे, सामने, खेळांदरम्यानच्या गमतीजमती, कसोटीचे आणि विजयाचे प्रसंग, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2014 रोजी प्रकाशित
विशलिस्ट : फिक्शन
१) अंगारे : सज्जाद ज़्ाहीर, अहमद अली, राशीद जहाँ, महमूद जफ़र, पाने : १४४१९५ रुपये. हा संग्रह स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२ साली बंदी आलेल्या उर्दू लेखकांचा आहे.
First published on: 14-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New books to read