भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा वा कोणताही धर्म न पाळता निधर्मी राहण्याचा मूलभूत अधिकार राज्यघटनेने बहाल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने, ‘धर्माची नोंद करण्याची सक्ती करता येणार नाही’ असा आदेश दिला आहे. मंगळावर झेप घेणाऱ्या भारतात आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्माच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना न्यायालयाची चपराक आहे, असेच म्हणावे लागेल.

मानसिकता बदलण्याची संधी..
‘सर्वपित्री अमावास्ये’च्या २४ सप्टेंबर २०१४ या दिवशी भारतातील वैज्ञानिकांनी भारताचे नाव जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी रेखले. ‘नासा’सारख्या जगविख्यात संस्थेला भारताच्या- इस्रोच्या ‘मॉम’ने आश्चर्याने तोंडात बोट घालण्यास भाग पाडले आहे . मंगळयान मोहीम पहिल्याच प्रयत्नात आणि ४५० कोटी रुपये खर्चात यशस्वी करून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्रपणे आपले स्थान निर्माण केले आहे. या अशा ऐतिहासिक घटना सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करावा अशाच असतात. त्याच प्रमाणे पत्रिकेतील मंगळ आणि मंगळावर यशस्वीपणे झेप घेणारे आपलेच बांधव याचे जरासे सर्वानी अवलोकन करावे.. खरे तर ही वेळ आहे भारतीयांची मानसिकता बदलण्याची!  
अनेक कोटी किलोमीटर दूर असणारा मंगळ ग्रह आपल्या ‘पत्रिके’त काय करतो आहे  आणि आपण त्याला अवकाशात न पाहता पत्रिकेत का पाहतो? हा प्रश्न वैज्ञानिकांनीसुद्धा अनेकदा मांडला; परंतु आपले भारतीय नागरिक ते मानायला तयारच नाहीत. लग्नासारखी पवित्र आणि खासगी गोष्ट; परंतु अनेकांच्या जीवनात या एका ग्रहामुळे ती मंगलमय होत नाही. अशा अंध दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी जरासे दाभोलकर, नारळीकर किंवा  वैज्ञानिकांच्या नजरेने या आपल्या सभोवती पाहिले, तर निसर्गात दडलेले विज्ञान आढळून येईल. त्यासाठी फक्त डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे.
अभिजीत राजन कुलकर्णी, बार्शी (जि. सोलापूर)

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?

ज्योतिष वा अध्यात्म हवे, पण भीतीपायी नव्हे!  
मुलीला मंगळ आहे हे समजले की मुलींच्या आईवडिलांच्या पोटात गोळा येतो. ‘मंगळाची मुलगी नको रे बाबा..! ’ म्हणून चांगल्याचांगल्या मुलींची स्थळे नाकारणारे मुलांचे आई- बाप आजही सर्वत्र दिसतात आणि हे सारे उच्चभ्रू, सुशिक्षित समाजात अगदी राजरोसपणे चालू आहे. अनेक ज्योतिषी मंगळ ‘कडक’ आहे का ‘सौम्य’ आहे तेही सांगत आपला धंदापाणी करत असतात.
ज्योतिष ही अंधश्रद्धा आहे, हे शास्त्र नाही असे कोणीही कितीही ओरडत बसले तरी या परिस्थितीत अजूनही जाणवेल असा बदल दिसत नाही. एरवी इंग्लिश तारखेप्रमाणे वाढदिवस वगरे साजरी करणारी मंडळी घरातले म्हातारे माणूस वारले की तत्परतेने ज्योतिषाकडे जाऊन ‘त्रिपाद’ नक्षत्र वगरे तर लागले नाही ना याची चौकशी करतात. या सर्वामागे एक अनामिक मानसिक भीती, हे कारण असते.
वास्तविक, ज्योतिष हे जरी शास्त्र नसले तरी तो एक विद्य्ोचा विषय असल्याने त्याचा अभ्यास वा सखोल संशोधन होणे ही गरज आहे. भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाचा अर्थदेखील नीट समजावून घेणे आपले जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. या स्पष्टतेच्या अभावी मोठमोठय़ा पदव्या घेतलेले लोकसुद्धा बुवाबाजीला बळी पडतात.
नव्या सुशक्षित तरुण पिढीनेच आता अशा गोष्टींकडे अधिक जगरूकतेने बघितले नाही तर उद्या जरी आपण मंगळावर उतरलो तर ‘मंगळावरचा नवरा नको गं बाई..! ’ असा सूर निघाल्यास नवल वाटू नये. पंचांगकत्रे तसेच या विषयावर शास्त्रीय दृष्टिकोन असलेले अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे आवाहन (लोकसत्ता, २५ सप्टें.) त्याचमुळे स्वागतार्ह वाटते.
– प्रदीप अधिकारी  

सुट्टय़ा हव्याच का?
‘बँकसुट्टय़ांचा बाऊ नको’ हे पत्र वाचले. (लोकमानस, २५ सप्टें.) पुढच्या आठवडय़ात एकामागून एक सलग सुट्टय़ा आल्याने वृत्तपत्रात चर्चा सुरू झाल्या आहेत. नोकरदार समर्थन करतात तर ज्यांना त्रास होतो ते त्रागा!  ज्यांनी तोडगा काढायला हवा, ते त्यांना विशेष झळ बसत नसल्याने शांत राहतात. सुसंघटित कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा हा काही सहज सुटणारा गुंता नाही याची जाणीव असल्याने असेल कदाचित; पण कुणी यावर निर्णय घ्यायला धजावत नाही. त्याची झळ मात्र सामान्य नागरिकांनाच बसते. सुट्टय़ा किती व कशा असाव्यात, न्यायालयाच्या सुट्टय़ा हे विषय कधी संपतील कोण जाणे. पण हा विषय जनतेच्या सहानुभूतीचा कधीच झाला नाही.    
बँकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले यात वाद नाही, पण तरी बँकांतील गर्दी आणि लागणारा वेळ का कमी होत नाही यावर विचार व्हायला हवा. अत्यावश्यक सेवांना जे नियम आहेत तेच नियम आता बँकासारख्या सरकारी आस्थापनांना व इतर प्रशासकीय कार्यालयांना लागू करणे गरजेचे वाटू लागले आहे. ज्या सुट्टय़ा अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी उपभोगू शकत नाहीत त्या सुट्टय़ा हे लोक सुखनव उपभोगतात. मतदानाला यांना पूर्ण दिवस सुटी तर अत्यावश्यक कामगाराला दोन तास.. ही तफावत नाही? कालानुरूप त्यात बदल करणे काही खासगी बँका वगळता कोणालाही नको आहे. तज्ज्ञ मंडळी यावर अनेक उपाय व सुधारणा सुचवू शकतील. सामान्य लोकही अनुभवातून खूप काही सुचवू शकतात. इंग्रजाचे साहेबी नियम सुटी उपभोगणाऱ्यांना योग्य वाटत असतीलही पण रयतेचं राज्य आलं आहे, तर रयतेची गरज विचारात घ्यायला नको?
 बँका सकाळी आठ ते दोन व दोन ते रात्री दहा अशा दोन पाळ्यांमध्ये चालविल्या तर ज्यांना बँकेच्या कामासाठी सुटी घेण्याशिवाय पर्याय नसतो असे अनेक लोक दुवा देतील. यात प्रश्न येतो धोरणांचा, कर्मचारी संख्येचा! संघटनांना विश्वासात घेऊन प्रशासनाने, शासनाने खरं तर हा प्रश्न कधीच निकालात काढायला हवा होता.
  दुसरा उपाय आहे सर्व सुट्टय़ा, विशेषत धार्मिक  सुट्टय़ा, वैकल्पिक करण्याचा. निदान अध्रे कर्मचारी जरी सार्वजनिक सुटीच्या दिवशी उपलब्ध असले तरी आवश्यक कामे होतील. हा सुद्धा धोरणांचा विचार करून नीट शास्त्रशुद्ध मांडणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने सोडविता येण्यासारखा मुद्दा आहे. रविवारी सुद्धा बँक सुरू राहील अशी व्यवस्था करता येणे कठीण वाटत असले तरी अशक्य मात्र नाही. बस, रेल्वे, आरोग्य, वीज या सारखी अनेक व्यवस्थापने बिनबोभाट विनातक्रार सुट्टय़ांचं नियोजन करून अहíनश सेवा देतात तर बँकासारखी आवश्यक सेवा निदान रात्री १० पर्यंत व पूर्ण ३६५ दिवस का उपलब्ध होऊ शकत नाही?  बँकांच्या सुट्टय़ांचे वेळापत्रक आधीच जाहीर होते त्यानुसार जनतेने नियोजन करावे, असा सल्ला देणे सोपे, पण  याच नियमाने दवाखाने बंद ठेवले किंवा कोणतीही सेवा बंद ठेवली तर चालेल का?  
दिलीप रा. जोशी, नाशिक

दगडांऐवजी आग हवी होती
वाघ किंवा तत्सम प्राण्यांनी माणसाचा बळी घेणे मुंबईत तरी नवीन नाही.. बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानाच्या, आरे कॉलनीच्या, पवईच्या परिसरांतील जनतेला ही डोक्यावरील टांगती तलवार नवीन नाही. परंतु प्राणीसंग्रहालयातील वाघाने प्रेक्षकास हल्ला करून ठार मारणे ही नक्कीच अंगावर काटा आणणारी घटना आहे. यामध्ये महत्त्वाची बाब ही की तिथे असणाऱ्यांपैकी एकाने या घटनेचे चक्षुर्वैसत्यम् व्हिडीओ चित्रीकरण केले. हे चित्रण पाहून हे लक्षात येते की बहुसंख्य जनतेस वाघापासून संरक्षण कसे करावे याची जरासुद्धा माहिती नाही. न पेक्षा त्या मुलाचा जीव नक्कीच वाचला असता.
सर्व प्रथम सदर तरुण हा मुटकुळे करून बसलेला दिसण्यात येतो. या ठिकाणी एक लक्षात घेतले पाहिजे की अशा प्रसंगी शक्यतो उभे राहणे श्रेयस्कर असते कारण वाघ अगदीच निरुपाय झाल्याशिवाय आपल्यापेक्षा उंच प्राण्यावर हल्ला करीत नाही. तसेच प्रेक्षकांपैकी कोणी एखादे वर्तमानपत्र पेटवून खाली टाकले असते तर वाघ परत फिरला असता कारण वाघ आगीला घाबरतो. दगड मारून पाठी फिरायला तो काही कुत्रा नव्हता. त्याने परिस्थिती मात्र चिघळली.
शेखर पाठारे