‘धनराशी जाता मूढापाशी…’ हा अग्रलेख (१ एप्रिल) वाचला. निवडणुकीच्या काळात आयकर विभाग काँग्रेसच्या पाठीमागे हात धुऊन लागला आहे, १०-१२ वर्षांपूर्वीची प्रकरणे उकरून काढली जात आहेत. नोटीस बजावली जात आहे, खाती गोठविण्यात येत आहेत, खात्यातून पैसे वळते करून घेतले जात आहेत. आयकर विभाग केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. केंद्र सरकारच्या सहमतीशिवाय आज कोणतीही यंत्रणा काम करत नाही, हे स्पष्टच दिसते.

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या, पैसा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. बहुतेक राजकीय पक्ष आयकर भरत नाहीत, पारदर्शकपणे उत्पन्नाचा स्राोत जाहीर करत नाहीत. मात्र निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने राजकीय पक्षांना त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्षाला कोट्यवधी रुपये कोणाकडून आणि का मिळतात, हे देशासमोर आले आहे. भाजप तर मोठा लाभार्थी ठरला आहे. असे असताना काँग्रेसप्रमाणेच इतर पक्षांनी या मिळालेल्या देणग्यांवरचा कर भरला आहे का, हे जनतेसमोर यायला हवे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयटी विभाग काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाला नोटीस बजावतो, ईडी अरविंद केजरीवाल यांच्यासहित आपच्या अनेक प्रमुख नेत्यांमागे हात धुऊन लागते आणि त्याच वेळी सीबीआय प्रफुल्ल पटेल यांना ‘क्लिन चिट’ देते. भ्रष्टाचाराबाबत भाजप, मोदी सरकार आणि तपास यंत्रणांची दुटप्पी भूमिका देशासमोर आली आहे. भ्रष्टाचाराबाबत तर मोदी बोलतात एक आणि करतात दुसरेच, हे आता नित्याचेच झाले आहे. हरतऱ्हेने विरोधकांची कोंडी करून त्यांना निवडणूक लढवूच द्यायची नाही, असा प्रकार देशात प्रथमच होत आहे.

BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
division of votes in vidarbha constituencies
विदर्भात मतविभाजनासाठी ‘उदंड झाले अपक्ष’; ‘हरियाणा पॅटर्न’ची चर्चा
Maharashtra assembly election 2024 BJP rebel Dadarao Keche moved out of Maharashtra
आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले

● अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

हेही वाचा >>> लोकमानस : त्रासाची जबाबदारी स्वीकारली नाही

करदहशतवाद म्हणून काय साधणार?

धनराशी जाता मूढापाशी…’ हा अग्रलेख वाचला. अशा नोटिसा पूर्वीच बजावता आल्या असत्या, त्या ऐन निवडणुकीच्या तोंडावरच का बजावण्यात आल्या, असा आक्षेप घेता येऊ शकतो. सत्ताधारी पक्षाने आयकराची पूर्तता नियमानुसार केली आहे का, या संदर्भातील तपशील जाहीर करण्याची आग्रही मागणी विरोधकांनी प्राप्तिकर विभागाकडे करणे गरजेचे आहे. त्याऐवजी फक्त करदहशतवादाच्या आरोपाचा पुनरुच्चार करत राहणे योग्य वाटत नाही. त्याचबरोबर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच एखाद्या जुन्याजाणत्या राजकीय पक्षाच्या बँक खात्यावर बंदी घालणे त्यांना कोंडीत पकडण्यासारखे आहे, हे निश्चित.

एवढ्या जुन्याजाणत्या पक्षाला आयकर, तसेच इतर हिशोबांच्या मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यासाठी सनदी लेखापाल नेमलेले नाहीत का? काँग्रेससह माकप, भाकपलाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सध्या गाजलेल्या रोख्यांच्या धनराशी सर्वांत जास्त कोणाच्या वाट्याला गेल्या याचा पाठपुरावा अभ्यासपूर्ण निरीक्षणातून आणि कर सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेससारख्या जुन्याजाणत्या पक्षाने केल्यास, त्यांना दुखावणाऱ्या आणि त्यांच्या गलितगात्र अवस्थेला पाहून आनंद साजरा करणाऱ्या सत्ताधारी पक्षास किती धनराशी मिळाल्या याबाबत तपशील मिळवता येतील. प्राप्तिकर विभागाच्या आयकर वसुलीसाठी आलेल्या नोटिसांना नुसतेच करदहशतवाद असे संबोधून काय मिळणार आहे?

● प्रशांत कुळकर्णी, कांदिवली (मुंबई)

हेही वाचा >>> लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..

लोकशाहीतील अपेक्षा धुडकावणे अयोग्य

धनराशी जाता मूढापाशी…’ हा अग्रलेख वाचला. सध्या ईडी, सीबीआय व आयटी यांच्या मागे लपून जगातील सर्वांत मोठा व बलाढ्य भाजप दुर्बल विरोधकांविरुद्ध ऐन निवडणूक काळात ज्या कारवाया करत आहे, त्या एका विशिष्ट वर्गाला प्रशंसनीय वाटल्या तरी किमान सामान्यज्ञान असलेल्या इतर सर्व पामरांना शंकास्पद व लोकशाहीसाठी भयसूचक वाटतील. भ्रष्टाचारावर कडक कारवाई जरूर हवी, पण ती निवडक व स्वैर नसावी आणि निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी असावी, या लोकशाहीतील साध्या अपेक्षा उघडउघड धुडकावल्या जात आहेत.

एकाही सत्ताधारी नेत्यावर किंवा सत्ताधाऱ्यांना आता सामील झालेल्या ‘पूर्वाश्रमीच्या भ्रष्ट’ विरोधकांवर वरील संस्था कधीच कारवाई करत नाहीत हे आता आबालवृद्ध जाणतात. विरोधकांना येनकेनप्रकारेण धुळीस मिळवताना स्वत:ची नैतिकता कधीच लयास गेल्याचे निवडणूक रोख्यांचा महालाभार्थी भाजप मान्य करेल काय? लेखातील खाडिलकरांच्या पदात पुढे म्हटल्याप्रमाणे ‘सत्ता सुखरत अधमाला, धन जड जना मदत पतना’ हे भाजपने विसरू नये अन्यथा ‘धैर्यधरा’चा ‘लक्ष्मीधर’ कधीच झाला आहे, हे भक्तांच्यासुद्धा लक्षात येईल.

● अरुण जोगदेवदापोली

तपास संस्थांना निवडक दिव्यदृष्टी’?

युद्धाआधीच प्रतिद्वंद्वीला कमकुवत केले तर विजयाचा रंग गडद होत नाही, याचे भान ‘अब की बार ४०० पार’ म्हणणाऱ्या पक्षाला बहुधा राहिलेले नसावे. राममय वातावरणात अवतारी पुरुषाविषयीची शाश्वती बहुधा कमकुवत झाली असावी, म्हणून निवडणुकीच्या तोंडावर असले उपद्व्याप करण्याची वेळ आली असावी. स्वायत्त संस्था खविंदचरणी लोटांगण घालण्यास आतुर झाल्या आहेत, मग त्यात आयकर विभाग कसा मागे राहणार? कर्तव्यकठोर जगातील सर्वांत मोठ्या पक्षाला नोटीस बजावून पापाचे भागीदार होण्यास आयकर विभाग निश्चितच दूधखुळा नाही. पै-पैचा हिशेब देऊ अशी सिंहगर्जना करून सत्तेत आलेल्यांनी पै-पैचा हिशेब मागणाराच समोर येऊ नये, याची तजवीज केल्याचे दिसते. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या चुकांची ओळख या संस्थांना पटावी अशी दिव्यदृष्टीच प्रदान करण्यात आल्याचे दिसते. ही दृष्टी केवळ विरोधी पक्षांसंदर्भातच प्रभावी ठरावी, असा मोलाचा सल्ला कानात दिलेला नाही, असा दावा कोणीही करू शकत नाही.

● परेश प्रमोद बंगमूर्तिजापूर (अकोला)

भाजपचा हार्दिकदेशभर होऊ शकतो!

दिल्लीत भाजपचा हार्दिक पंड्या क्षण?’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लालकिल्ला’ (१ एप्रिल) वाचला. दिल्लीतील अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती इथपर ठीक आहे. त्यानंतर भले योगेंद्र यादव, प्रशांत भूषण त्यांच्यापासून दूर गेले परंतु योगेंद्र यादव यांनी सध्या तरी भाजपला दूर ठेवले असले, तरीही राजकीय विचार आत एक आणि बाहेर एक नाहीत. याउलट केजरीवाल यांनाच भाजपची बी टीम म्हटले जात होते. त्यांची महत्त्वाकांक्षा भाजपच्या लक्षात आली तेव्हा राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते आणि सलग दोन वेळा दिल्ली काबीज केल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढला होता. हे भाजपच्या लक्षात आल्यावर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली, मात्र त्यातून केजरीवाल यांचेच राजकीय बळ वाढले आहे. ज्या दिल्लीत केजरीवाल यांनी विविध सेवा मोफत आणि रास्त दरात दिल्या ते दिल्लीकर साहजिकच केजरीवाल यांच्या पारड्यात मते टाकतील. कारण केजरीवाल हे भले मुरब्बी राजकारणी नसतील पण चाणाक्ष आहेत. प्रशासकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्याचमुळे भाजपला जिकडे तिकडे विरोधी पक्ष लक्ष्य करत आहेत, हे मतदारांच्या नजरेत आता येऊ लागले आहे. त्याचमुळे भाजपचा हार्दिक पंड्या होऊ लागला आहे, यातून तरी भाजपने जरा बोध घ्यायला हवा.

● सुनील समडोळीकरकोल्हापूर

चारसो पारचे दावे, तरी निवडणुकांची भीती?

विरोधकांचे शक्तिप्रदर्शन! पंतप्रधानांचे मॅचफिक्सिंग’ ही बातमी (लोकसत्ता- १ एप्रिल) वाचली. त्यामागचे एक कारण म्हणजे सध्या राहुल गांधी तसेच विरोधकांच्या सभांना होत असलेली तुफान गर्दी. त्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकली असणार. एक गोष्ट समजत नाही की, पंतप्रधान मोदी हे सतत काँग्रेसचा द्वेष करत का करतात? काँग्रेसने आर्थिक घोटाळा केला. काँग्रेस दुबळी झाली आहे, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण मोदी मात्र मी, विकसित भारतचे स्वप्न पूर्ण करत आहे. आम्ही समृद्धी महामार्ग, मेट्रो यांसारखे प्रकल्प पूर्ण केले, अशी स्वत:ची टिमकी वाजवत असतात. या वेळी ‘चारसो पार’ असे छातीठोक सांगणाऱ्या मोदींना निवडणुकांची भीती का वाटावी? ● गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)