जैवविविधतेच्या दृष्टीने जागतिक पातळीवर संवेदनशील मानल्या गेलेल्या पश्चिम घाटाचा कोकण हा महत्त्वाचा हिस्सा आहे. बिबटे, अस्वले, रानडुकरे, कोल्हे, तसेच विविध प्रकारच्या पक्षी आणि फुलपाखरांमुळे या प्रदेशाला कमालीची नैसर्गिक विविधता प्राप्त झाली आहे. पण ही नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होण्याचे संकट जगाच्या अन्य भागाप्रमाणे कोकणातही उभे ठाकले आहे. मात्र त्यापुढे हार न मानता रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकर्ते गेली सुमारे दोन दशके या क्षेत्रात व विविध आघाड्यांवर झपाटून काम करत आहेत. त्याचा आगामी पिढ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.         

ह्याद्री संकल्प सोसायटी’ गेल्या १७ वर्षांपासून देवराया जोपासणे आणि जंगलवाढ होण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेने जंगल वाढीसाठी कोणते घटक कारणीभूत आहेत, याचा सर्वप्रथम अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी असे लक्षात आले की, जंगलातील शेतकरी म्हणून ओळखला जाणारा धनेश (हॉर्नबिल) पक्षी जंगल वाढीसाठी मोठा हातभार लावत आहे. याविषयी ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ने धनेशच्या प्रजाती शोधून काढून त्याच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जंगलतोडीमुळे धनेश पक्ष्यांच्या ढोल्या असलेली झाडेच नष्ट झाली आहेत. त्यामुळे धनेश पक्ष्याचे अस्तित्वात धोक्यात आले आहे. कोकणात धनेश पक्ष्याच्या चार प्रजाती आढळतात. त्यातील मोजकेच पक्षी आता शिल्लक राहिले आहेत. हा पक्षी मुख्यत्वे फलाहारी आहे. तो वड, पिंपळ, उंबर, धेड उंबर, करवत, पिंपरी, नांदरुख अशा वृक्षांची फळे खातो. या वृक्षांची फळे खाऊन त्यांच्या बिया आपल्या विष्ठेमार्गे सर्वदूर पोहोचवत असतात. धनेश पक्ष्याच्या पचनसंस्थेत होणाऱ्या अभिक्रियेमुळे अनेक वृक्षांच्या कठीण कवचांच्या बियांचे कवच मऊ होऊन सहज रुजतात. त्यामुळे बऱ्याच वृक्ष प्रजाती या धनेश पक्ष्यांवर अवलंबून असतात.

Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
indian concept religion laws Constitution of India Rashtradharma granth
धर्मानुसार वर्तनाला कायद्याची परवानगी, पण म्हणून वाट्टेल ते खपवून घेतले जाणार नाही!
Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!
book review my journey in lyrics and music memoir of syed aslam noor
 ‘पॉपी’ पर्वाचे पुराण…
Presvu Eye Drops
अग्रलेख : दावा, दवा, दुआ!
israeli attacks targeting hamas and hezbollah fighters
अग्रलेख : अधर्मयुद्धाचा अंत?
Anura Disnayake
अग्रलेख: दक्षिणेचा ‘वाम’पंथ!

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड

धनेश पक्ष्याचा जीवनक्रम

धनेश पक्षी दहा ते वीसच्या संख्येत थव्याने फिरत असतात. विणीच्या हंगामाच्या वेळी या पक्ष्यांचे थवे एका जागी जमतात. तेथे ते आपल्या जोड्या जुळवितात. या जोड्या आयुष्यभर आपली साथ देत असतात. धनेश पक्षी स्वत:च्या संरक्षणासाठी वृक्षावरील ढोल्या शोधून तेथेच आपले वास्तव्य करतात. धनेश मादीला अंडी घालण्यासाठी योग्य आणि सुरक्षित ढोली मिळाली की, मादी तीन ते चार महिने स्वत:ला बंदिस्त करून घेते. मादी आपली लाळ, विष्ठा, फळांचा गर, माती यांचे मिश्रण करून ढोली लिपून घेते. आपली चोच बाहेर राहील एवढी जागा ठेवून स्वत:ला बंदिस्त करून घेते. यादरम्यान मादीला फळ आणून देण्याचे काम नर धनेश करत असतो. ९० दिवसांच्या कालावधीत मादी आपल्या पिल्लांना जन्म देत असते. मात्र आता मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगल तोडीमुळे या धनेश पक्ष्याच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. धनेश पक्ष्याचे प्रजनन करण्यासाठी ढोल्या असणारे वृक्ष नसल्याने आणि खाद्या वनस्पतींची कमी यामुळे धनेश पक्ष्याची नवी पिढी वाढण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

जंगले वाढवायची असतील तर धनेश पक्ष्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन २००७ पासून ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ने यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल कॅमेरे झाडावर बसवले जातात. त्यांच्या विष्ठेपासून मिळणाऱ्या बिया एकत्रित करून त्यातून रोपवाटिकेची संकल्पना पुढे आणली. धनेश पक्ष्याला खाद्यासाठी लागणारी झाडे पुनर्निर्माण करण्यासाठी एक नर्सरी उभारली. त्यासाठी पक्ष्याच्या विष्ठेमधून मिळणाऱ्या बिया गोळा करून आणणे अवघड काम या सोसायटीने सुरू केले. त्यासाठी धनेश बीज संकलन समूहाची निर्मिती करण्यात आली. सद्या:स्थितीत गाजरा, कडू कवट, जंगली बदाम, जायफळ, सुरमाड, पिंपळ, मायफळ, उंबर, वड, करवत, चारोळी, चांदफळ, कूकर, सरडोळ अशा खाद्या वृक्षांच्या वनस्पतींची रोपे तयार करण्याचे काम या संस्थेच्या नर्सरीतून केले जात आहे. ज्या ठिकाणी धनेश पक्ष्याच्या ढोल्या आहेत, त्या ठिकाणच्या परिसरात रोपे लावून झाडांची घनता वाढविण्याचे काम सह्याद्री संकल्पनेने हाती घेतले आहे.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : दीड शतकाच्या दस्तावेजांना आधुनिकीकरणाचा साज

याबरोबर कृत्रिम ढोल्या बनवून धनेश पक्ष्याचे संवर्धन करण्याचे काम ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’कडून करण्यात येत आहे. कोकणातील काही ठिकाणी कृत्रिम घरटी (ढोल्या) बसवून तेथील दैनंदिन निरीक्षण करण्याचे काम ही सोसायटी करीत आहे. यासाठी खासगी देवरायासुद्धा भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत. यातून ‘दत्तक ढोली’ ही संकल्पना पुढे आणून ज्या ठिकाणी धनेश पक्ष्याची ढोली आहे, ती ढोली जपण्याचे काम परिसरातील राहणाऱ्या लोकांकडे सोपवून त्यांना त्यासाठी काही मानधन दिले जाणार आहे. काही ठिकाणी बचत गटांच्या मदतीने ढोल्या वाचविण्यात काम करण्यात येत आहे. मात्र यासाठी लाखो रुपये खर्च असल्याने सोसायटीला आर्थिक मदतीची गरज आहे.

धनेश मित्र निसर्ग मंडळाची स्थापना

धनेशच्या संवर्धनातून मोठ्या प्रमाणावर जंगलांचे पुनर्निर्माण होणार असल्याने धनेश खाद्या झाडांची रोपवाटिका, खाद्या झाडांचे पुनर्रोपण, अधिवास पुनर्निर्मिती, कृत्रिम घरट्यांचा वापर आणि जागृती यातून धनेश संवर्धनाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनेश मित्र निसर्ग मंडळाच्या माध्यमातून धनेश संवर्धनाची लोक चळवळ उभी करण्यात येत आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारी २० गावांचा, शाळा, महाविद्यालयात धनेश मित्र निसर्गची स्थापना करण्यात आली आहे. देवरुख येथे पहिले धनेश मित्र संमेलन घेऊन ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ने धनेश आणि जंगल देवराया संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.

संस्थेचे इतर उपक्रम

‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ने धनेश आणि जंगल संवर्धनाबरोबर इतर काही महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये शाश्वत शेतीचा समावेश आहे. कोकणातील जंगलांना लागणारे वणवे कमी करता यावेत आणि राब काढण्यासाठी होणारी, वृक्षतोड थांबवण्यासाठी आदिम बियाणी आणि सेंद्रिय शेती प्रकल्प राबवला जात आहे. स्थानिक शेत जमिनीवर भात बियाणे नाचणीची लागवड करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भाजावळ मुक्त शेतीचे प्रयोग केले जात आहे. याबरोबर रान कुत्रे यांच्या हालचाली टिपणे आणि त्यांच्या प्रजाती शोधणे हेदेखील काम हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : तीन शतकांचा दुवा सांधणारी ‘पुणे सार्वजनिक सभा’

तथाकथित आधुनिक विकासाच्या वेळाने झपाटलेले राज्यकर्ते आणि आपल्या भावी पिढ्यांच्या भरभराटीची स्वप्न पाहणाऱ्या सध्याच्या समाजामुळे हवामान बदल निसर्ग आणि पर्यावरणाची हानी इत्यादी बाबींकडे सरसकट डोळे झाक केली जात आहे. पण हीच वृत्ती भावी पिढ्यांच्या मुळावर येण्याचा धोका आहे. त्यावर मात करण्यासाठी आपल्याला फार काही करता येणे शक्य नसेल तर किमान त्यासाठी काम करणाऱ्या ‘सह्याद्री संकल्प’ सारख्या सोसायट्यांना बळ देणे, ही आपली व्यक्तिगत आणि सामाजिक जबाबदारी ठरते.

आर्थिक साहाय्याची गरज

धनेश पक्ष्यांसाठी कृत्रिम ढोल्या बनविण्यासाठी तसेच त्यांचे दैनंदिन निरीक्षण करण्यासाठी कॅमेरा आणि अन्य साहित्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. देवराया वाचवणे व जंगल संवर्धनासाठी धनेश पक्ष्याच्या प्रजाती वाचवणे गरजेचे आहे. त्यांच्या देखभालीसाठी ४० ते ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याबरोबर धनेशाच्या विष्ठेपासून मिळणाऱ्या बिया त्यांची रोपे तयार होण्यासाठी रोपवाटिकेचा विस्तार करायचा आहे. त्यासाठीही पैशांची गरज आहे.

ऑनलाईन देणगीसाठी तपशील

सह्याद्री संकल्प सोसायटी

Sahyadri Sankalp Society

बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा मांटुंगा पूर्व, मुंबई

खाते क्रमांक : 100100102486

आयएफएससी कोड : COSB0000100

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८०-जीकरसवलतपात्र आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल

‘सह्याद्री संकल्प सोसायटी’ मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर शहरापासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेल्या देवरुख शहरात आहे. या संस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी संगमेश्वर बस स्थानकातून एसटी बसने अथवा खासगी वाहनाने पोचू शकता. संपर्क…७७९८२३३२४३

धनेश पक्षी आणि जंगल वाढीसाठी, त्याचबरोबर देवराया जोपासण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा भरून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाते. धनेश पक्षी जगविणे आणि जंगल संवर्धन करणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचे काम संस्था करीत आहे.

पारंपरिक रासायनिक शेती न करता शेतकऱ्यांनी सेंद्रिय आदिम शेती करावी. यातून होणारे फायदे आणि त्यांचे महत्त्व पटवून देऊन स्वत:च या सोसायटीने शेती करण्यास सुरुवात केली आहे.

●धनेशासाठी दत्तक घरटी घेऊन त्यांचे देखभालीचे काम स्थानिक लोकांना देऊन धनेश आणि जंगल संवर्धनासाठी या संस्थेने मोठा प्रयत्न सुरू केला आहे.●धनेश आणि जंगलांचे महत्त्व टिकवण्यासाठी सह्याद्री संकल्पनेने रत्नागिरी जिल्ह्याबरोबर रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काम करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देशभर हा उपक्रम राबवण्याचा मानस या संस्थेचा आहे.

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

धनादेश येथे पाठवा…

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मेन्शन, तनिष्क शोरूमच्या वरती, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. दूरध्वनी क्रमांक – २५३८५१३२

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५