कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत भारतीय बनावटीची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तयार करणे किंवा ते शक्य नसल्यास त्यांची मुक्त आयत व विदेशातून भारतात केली गेलेली आयात व तदनंतरची निर्मिती (ऑफ द शेल्फ इम्पोर्ट/ फॉरीन इन्व्हेस्टमेंट रिलेटेड इम्पोर्ट) हे संमिश्रित धोरण २०१९पासून अमलात आले आहे. आजमितीस भारतात लष्करी उपग्रह, मोठ्या वजनी/ उखळी तोफा, असॉल्ट/ स्नायपर रायफल्स, विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे/ रॉकेट्स, वेपन लोकेटिंग रडार्स, असॉल्ट शिप्स/ विमानवाहू जहाज, टेहाळणी/ मारक ड्रोन, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने अशा विविध प्रकारच्या संरक्षणसामुग्रीची निर्मिती होते आहे. यात पाश्चात्य गुंतवणूक/ निर्मिती आणि स्वयंनिर्माण दोन्हींचा समावेश आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा सर्वांत जास्त फायदा, लढाऊ विमानांची लक्षणीय कमतरता असलेल्या भारतीय हवाई दलाला झाला आहे. लढाऊ विमानांच्या या कमतरतेबद्दल प्रसारमाध्यमांत वेळोवेळी चर्चा होतच असतात. 

Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Shivneri Sunadri News
Shivneri : विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’, भरत गोगावलेंची घोषणा
US Federal Reserve, interest rate cut
विश्लेषण : अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर कपात एवढी महत्त्वाची का? भारतातील बाजारावर काय परिणाम?
America Britain weapons supply ukraine
विश्लेषण: अमेरिका, ब्रिटनकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांची संजीवनी… रशियाविरुद्धचे युद्ध निर्णायक टप्प्यावर?
five trillion dollar economy
विश्लेषण: रुपयातील घसरणीने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टच अवघड?
onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
Boarding from left side
Boarding From Left Side : विमानात नेहमी डाव्या बाजूने का चढतात? प्राचीन काळातील ‘हे’ कारण जाणून घ्या!

हवाई दलाच्या सततच्या मागणीनुसार २०१९-२२ दरम्यान भारतात फ्रान्सकडून ३० ‘राफेल’ विमानांची आयात झाली. त्या खरेदीनंतरही भारतीय हवाई दलाला आपले ३२ स्क्वाड्रन्स (आपल्याकडे १८ विमानांची तुकडी म्हणजे एक स्क्वड्रन) कार्यरत करण्यासाठी जवळपास १२५ अतिरिक्त फायटर विमानांची आवश्यकता होती. योग्य विचारविमर्शानंतर, मिग/ जॅग्वार्सच्या कालबाह्य होत असलेला ताफा बदलण्यासाठी, चौथ्या पिढीतील फायटर एयरक्राफ्ट म्हणून तेजसची निवड करण्यात आली. ही विमाने ‘हिंदुस्तान एरॉनॉटिक लिमिटेड’मध्ये (एचएएल) तयार होतात. ‘एचएएल’कडे ९५ ‘तेजस’ विमानांची मागणी नोंदवली गेल्याची बातमी ऑगस्ट २०२३ मध्ये आली होती. परंतु तेजसच्या ‘एचएएल’मधील निर्मितीला विलंबित उत्पादन कालावधी (लेट प्रॉडक्शन शेड्युल), विमानाच्या उड्डाण शक्तीतील तथाकथित कमतरता (लेस पाॅवर आऊट पुट), त्याची शस्त्र क्षमता (टाईप ऑफ आर्मामेंट) आणि जलद हालचालीतील कमतरता (मॅन्युव्हरेबिलिटी); या कारणांसाठी प्रचंड टीकेला सामोर जावे लागले. या टीकेचे मूळ राजकीय द्वेषातही असल्याने त्यावर भाष्य करणे या लेखाच्या आवाक्यापल्याड आहे. पण टीकाकारांनी तेजसची सामरिक क्षमता, हवाई दलाची निकड आणि संरक्षण खात्यावरील आर्थिक मर्यादांकडे दुर्लक्ष केल्याचे मात्र प्रत्ययास येते. प्रत्यक्षात, हवाई दलाच्या ज्या वैमानिकांनी तेजसचे मूलभूत आणि नंतर प्रदीर्घ उड्डाण परीक्षण केले होते त्यांना त्या विमानाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच हवाई दलाला ही विमाने हवी आहेत.

हेही वाचा >>>ग्राहक संरक्षणाचा खेळखंडोबा किती दिवस चालणार? 

तेजसच्या उत्पादनाच्या वेळापत्रकाचा विचार केल्यास हे आढळून येते की, चौथ्या पिढीतील या सुपरसॉनिक फायटरच्या निर्मितीत नक्कीच काही चढउतार झाले. सुरुवातीला विमानांचे प्रत्यक्ष उत्पादन वेळापत्रकापेक्षा काही प्रमाणात संथ होते. पण हवाई दलाचे वैमानिक, तेजस विमानाच्या क्षमतेबद्दल संपूर्णतः समाधानी आहेत. हवाई दलात येणारी ९५ नवीन तेजस एमके १ विमाने, आपल्या संरक्षणदलांची मारक क्षमता वृद्धिंगत करतील याची त्यांना खात्री आहे. भारतीय हवाई दलाच्या ४५ फ्लाइंग डॅगर्स आणि १८ फ्लाइंग बुलेट या दोन स्क्वॉड्रन्समध्ये मिळून सध्या ३० पेक्षा जास्त तेजस विमाने सामरिकदृष्ट्या कार्यरत/ तैनात (ऑपरेशनल डिप्लॉयमेंट) आहेत. तेजस विमानांचे प्रोटोटाइप आणि कार्यरत स्क्वाड्रन्समधील विमान चालवणाऱ्या/ वापरणाऱ्या हवाई दल वैमानिकांना तेजस विमानाच्या कार्यक्षमतेबद्दल वाटणारा अदम्य विश्वास हेच यामागील कारण आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. 

त्यांनाही वेळ लागला!

तेजस विमान विकसित करण्यासाठी एचएएलला थोडा जास्तच वेळ लागला यात शंका नाही. पण तुलनात्मकदृष्ट्या त्यांचे उत्पादन वेळापत्रक हे फ्रान्सच्या राफेल आणि अमेरिकी एफ-३५ यांच्यासारख्या आधुनिक फोर्थ जनरेशन फायटरसारखेच आहे. फ्रान्सच्या राफेल प्रोटोटाईप विमानाने १९८६ मध्ये पहिली गगनभरारी घेतली होती, पण फ्रेंच हवाई दलात त्याचा प्रवेश २००१ मध्ये झाला. अमेरिकन एफ ३५चे पहिले उड्डाण २०००मध्ये झाले होते, पण आणि यूएस मरीन कोअरमधे हे विमान कार्यरत होण्यासाठी २०१५पर्यंत वाट पाहावी लागली. त्याचप्रमाणे तेजसच्या विकासालाही १५-१६ वर्ष लागली. तेजसच्या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांनी २००१मधे प्रथम उड्डाण केले. जुलै २०१६मध्ये पहिली दोन विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली आणि २०२० पर्यंत वर दोन स्क्वाड्रन्स कार्यरत झाले. राफेल आणि एफ-३५ या दोघांनीही त्यांच्या सुरुवातीच्या आवृत्त्यांत बऱ्याच मर्यादित क्षमतेसह उड्डाणे केली होती. त्यावर त्यांच्या नंतरच्या आवृत्यांमधे तोडगा काढण्यात आला, हेच तेजसच्या बाबतीतही घडले, घडते आहे.

हेही वाचा >>>युद्धखोर कोण? हमास की इस्रायल- हे एकदाचे ठरू द्या!

‘तेजस’ची तांत्रिक क्षमता

तेजसच्या प्रोटोटाईपमधे हवाई दलाच्या वैमानिकांना हवे ते आाणि हवे तसे इच्छित बदल (मॉडिफिकेशन्स) ‘एचएएल’ने केले आहेत. त्यामुळे आता तेजसची उड्डाण क्षमता (मॅन्युव्हरेबिलीटी) आणि त्यातील उड्डाण संसाधन (ऑन बोर्ड सिस्टिम्स) मिग विमानांपेक्षा उच्च दर्जाची ठरते आहे. त्यात भारतीय बनावटीची उड्डाण नियंत्रण यंत्रणा (फ्लाय बाय वायर कंट्रोल सिस्टिम) लावण्यात आल्यामुळे, त्याची उड्डाण स्थिरता (फ्लाईंग स्टॅबिलिटी), चपळता, उड्डाण क्षमता आणि आणि अस्त्र-कौशल्य वाखाणण्याजोगे झाले आहे. तेजसची गुरुत्वीय यंत्रणा (ग्रॅव्हिटेशनल ऑनसेट) वैमानिकाच्या सर्व निर्देशांना अचूक व अविलंब प्रतिसाद देते. तेजसची उड्डाण क्षमता, चपळता आणि गती (स्पीड) यांच्यात कुठल्याही प्रकारचे परस्पर अवलंबित्व नसल्यामुळे तेजस कुठल्याही गतीत, वैमानिकानी फ्लाय बाय वायर यंत्रणेद्वारे दिलेल्या सूचना/ निर्देश अचूकपणे फ्लाइट कंट्रोल सिस्टमपर्यंत पोहोचवते आणि मग विमान त्या प्रमाणे कार्य करते. यामुळे तेजसचा सुरक्षा मापदंड (सेफ्टी फॅक्टर) अव्वल दर्जाचा झाला आहे. 

आजमितीला तेजस विमानांनी, कुठल्याही प्रकारचा अपघात न होता, ६५०० तासांचे उड्डाण केले आहे. वैमानिक तेजसच्या जबरदस्त फ्लाइट कंट्रोल सिस्टीमच्या आधारे सर्व प्रकारच्या हवाईउड्डाण हालचाली करून विमानाला आकाशात नेऊ/ चालवू शकतो. यात वैमानिकाच्या अचूक कार्यकुशलतेचा भाग आहे. परंतु, जर काही अगम्य कारणास्तव त्याच्याकडून असे करताना काही चूक झाली तर तेजसची संयंत्रणा आपोआप, स्वत: हस्तक्षेप करून परिस्थिती सांभाळते (रिट्राईव्ह द सिच्युएशन). एरियल रिफ्यूएलिंगसारखे उच्चस्तरीय रसद लाभ कार्य करताना तेजसची उत्कृष्ट नियंत्रणप्रणाली आणि सुलभ हाताळणी सहज कार्यरत होते. तत्काळ वळण (इन्स्टंटेनियस टर्न) घेताना तेजसची उच्च प्रतीची ऊड्डाण क्षमता प्रत्ययास येते. तेजसची खासियत असलेल्या डेल्टा विंग प्लॅटफॉर्मवर (उलट पंख आकृती) निर्माण होणारा पारंपारिक ताण (ट्रेडिशनल ड्रॅग) उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळाने जाणवू लागतो. पण ही कमतरता हवाई दलात कार्यान्वित होणाऱ्या आगामी आवृत्तींमधे दूर करण्यात येईल. 

जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनीने निर्माण केलेले ‘जी ई एफ ४०४’ हे आजघडीचे जगातील सर्वांत चांगले जेट इंजिन असणाऱ्या तेजसमधे ऊर्ध्व उड्डाणशक्तीचा अतिरिक्त साठा (एक्सेस रिझर्व्ह ऑफ थ्रस्ट) आहे. यामुळे हे विमान त्याच्या पॉवर्ड एक्सलेरेशनच्या मदतीने, अकस्मात उंच चढण (सडन रेट ऑफ हाय क्लाइंब) आणि/ किंवा दीर्घकालीन शक्तिशाली वळणासारख्या (सस्टेन्ड हाय रेट ऑफ टर्न) करामती सहज करू शकते. आपले शक्तिशाली इंजिन आणि सशक्त ब्रेकिंग सिस्टिममुळे हे विमान, १५०० फुटांपेक्षा कमी लांबीच्या रनवेवरून उड्डाण घेऊ/ उतरू शकते. यामुळे विमानाला लडाख/ अरुणाचल प्रदेशातील अगदी लहान धावपट्टीवर तैनात करणे शक्य होईल. २०१८मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘गगन शक्ती’ या बहुराष्ट्रीय हवाई युद्धसरावात उत्कृष्ट कामगिरी करून तेजसने त्याची सामरिक क्षमता प्रदर्शित केली. संरक्षणतज्ज्ञांच्या मते, त्या वेळी दिसून आलेली तेजसची शत्रूमारक क्षमता पाहाता हे विमान आगामी किमान २० वर्षे तरी भारतीय हवाई दलात कार्यरत राहील. 

चीनविरुद्ध सक्षम!

भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना खात्री आहे की ‘तेजस एमके १ ए’ सांप्रत लडाखमध्ये तैनात असलेल्या राफेल आणि सुखोई ३० विमानांसारखे, युद्धजन्य परिस्थितीत तिबेट पठारावरील चिनी हवाई संरक्षण जाळ्यात (चायनीज एयर डिफेन्स नेटवर्क) प्रवेश करून त्याला भेदू शकेल. त्याचबरोबर, तेजसमधील उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम आपल्या हवाई दलाला चिनी विमानांमधील एअर रडार्स आणि हवाई/ जमिनी क्षेपणास्त्रांविरुद्ध सक्षम सुरक्षा कवच देऊ शकेल.