अलीकडे भावना एवढ्या नाजूक झाल्या आहेत की त्या कोणत्याही क्षुल्लक कारणावरून भयंकर दुखावल्या जातात. एखाद्या चित्रपट वा मालिकेतल्या कोणत्या प्रसंगावरून, शब्दावरून, दृश्यावरून त्या दुखावल्या जातील याचा नेम नसतो. पद्मावत, लव्हयात्री, रामलीला, आदिपुरुष, सेक्रेड गेम्स, महाराजा, तांडव… यादी लांबलचक आहे. कधी इतिहासाशी छेडछाड, कधी धार्मिक प्रतीकांचा अवमान, कधी निव्वळ एखाद्या धर्माशी निगडीत रंगाचा वापर, कधी एखाद्या उत्सवाच्या नावाशी साधर्म्य अशा कोणत्याही कारणावरून भावना वरचेवर दुखावल्या जातच असतात. ताजं निमित्त आहे आयसी- ८१४ द कंदाहार हायजॅक या वेबमालिकेतल्या पात्रांना देण्यात आलेल्या नावांचं. खरंतर ही नावं काही लेखक दिग्दर्शकांनीही दिलेली नाहीत, मात्र तरीही त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

ज्या सत्यघटनेवर ही वेबमालिका आधारित आहे, ती घडली २५ वर्षांपूर्वी- २४ डिसेंबर १९९९ रोजी. काठमांडूहून दिल्लीला निघालेल्या आयसी- ८१४ या विमानाचं हरकत- उल- मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने अपहरण केलं. विमान अमृतसर, लाहोर, दुबईहून अफगाणिस्तानात कंदाहारला नेण्यात आलं. त्या आठ दिवसांत घडलेल्या घटनांवर आधारित एक पुस्तक त्या विमानाच्या कॅप्टनने लिहिलं होतं. अनुभव सिन्हा यांनी त्यावर आधारित एका वेबमालिकेची निर्मिती केली आणि ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. मालिकेत दाखविलेल्या अपहरणकर्त्यांची नावे भोला, शंकर, बर्गर, डॉक्टर आणि चिफ अशी आहेत. त्यावरून असा वाद उद्भवला की भोला आणि शंकर ही हिंदू देवतांची नावे अपहरणकर्त्यांना देऊन हिंदूंच्या भावना दुखावण्याचा आणि अपहरणकर्ते हिंदू असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदू सेना या संघटनेच्या अध्यक्षांनी या वेबमालिकेवर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका दाखल केली. अखेर मालिकेत अपहरणकर्त्यांची मूळ नावं आणि त्यांनी घेतलेली टोपण नावं नमूद असणारी सूचना समाविष्ट करण्यात आली.

RSS chief Mohan Bhagwat remark on Manipur violence
अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?
loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का
telegram ceo pavel durov arrested in France
‘टेलिग्राम’च्या पावेल दुरोवला तुरुंगात टाकून कुणाचे भले होणार?
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
Loksatta editorial on pm Narendra modi dig at China in Brunei over supports development not expansionism
अग्रलेख: ‘या’ विस्ताराचे काय?
Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!

हेही वाचा : ‘टेलिग्राम’च्या पावेल दुरोवला तुरुंगात टाकून कुणाचे भले होणार?

पण इंडियन एस्क्प्रेसच्या वृत्तानुसार ही नावे काही २०२४मध्ये काल्पनिकरित्या देण्यात आलेली नाहीत. १९९९ मध्ये अपहरणकर्त्यांनी हीच सांकेतिक नावे घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत हीच नावं नमूद होती. एवढंच नव्हे तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरही हीच सांकेतिक नावं दिलेली होती. या वृत्तात यासंदर्भात उद्भवलेल्या वादाची संभावना मॅन्युफॅक्चर्ड आउटरेज म्हणजेच निर्माण केला गेलेला असंतोष अशा शब्दांत करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्याच अन्य एका वृत्तात बॉलीवुडमध्ये संरक्षण आणि गुप्तचर विभागाच्या कार्याचं नेहमीच कसं चुकीचं आणि अतिरंजित चित्रण केलं जातं, याचा आढावा घेण्यात आला आहे.

अपहरणकर्त्यांच्या नावांवरून फुकाचा वाद निर्माण करण्याऐवजी या मालिकेतून अधोरेखित झालेल्या निर्णयप्रक्रियेतील त्रुटींवर चर्चा होणं गरजेचं होतं, अशी भूमिका द प्रिंटच्या संकेतस्थळावर मांडण्यात आली आहे. एअर ट्रॅफिक कन्ट्रोलने इशारा दिल्यापासून कोणकोणत्या टप्प्यांवर चुका झाल्या याची जंत्रीच या वृत्तात मांडण्यात आली आहे. अलर्ट मिळाल्यानंतर पहिला निर्णय घेण्यासाठी तब्बल एक तास दवडण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे. त्यावेळी पोखरणमध्ये करण्यात आलेल्या अणुचाचण्यांमुळे भारतावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळू शकेल, तो तेव्हा मिळणं शक्य नव्हतं, याचीही आठवण करून देण्यात आली आहे. मौलाना मसूद अजहरला मुक्त केल्याचे दुष्परिणामही हा लेख मोजून दाखवितो. द हिंदूमधील वृत्तात पत्रकार सुहासिनी हैदर यांनी या घटनेच्या वार्तांकनाचा थरार मांडला आहे.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा

ऑप इंडियाच्या संकेतस्थळावरील वृत्तात काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टचा उल्लेख केला आहे. श्रीनेत म्हणतात की, काँग्रेसने दहशतवाद्यांना अटक केली, तर भाजप सरकारच्या काळात त्यांना मोकळं सोडण्यात आलं. पंजाबमध्ये ते विमान तब्बल ४५ मिनिटं होतं. तेव्हा तिथे भाजपचं सरकार होतं. त्यावेळी अपहृतांची सुटका करण्याचा प्रयत्न का झाला नाही. काँग्रेसचे पवन खेरा यांच्या पोस्टचाही उल्लेख यात करण्यात आला आहे. खेरा यांनी म्हटलं आहे की एका साहसी अधिकाऱ्याने यासंदर्भातलं सत्य सांगितलं आहे. भाजप सरकारने त्यावेळी कोणतेही प्रयत्न का केले नाहीत, हे एक कोडंच आहे. या पोस्टचा दाखला देत या संकेतस्थळाने काँग्रेसने अशाप्रकारे कोणकोणत्या दहशतवाद्यांना कधी मुक्त केलं, कोणाविरोधातले आरोप मागे घेण्यात आले, कोणत्या दहशतवाद्यांवर काहीही कारवाई करण्यात आली नाही, याची यादीच दिली आहे.

टेलिग्राफ ऑनलाइनने त्यावेळी नेमकं काय झालं होतं, याचा सचित्र वृत्तांत मांडला आहे. अपहरण करण्यात आलं तेव्हा रमजानचा महिना सुरू होता. त्यामुळे अपहरणकर्ते केवळ रात्रीच चर्चा करत. अजित डोवल त्यावेळी रोज रात्री तीन तास अपहरणकर्त्यांशी चर्चा करत याविषयी नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा : लोक खारींपासून हत्तींपर्यंत वाट्टेल ते का खातात?

कोणत्याही सत्यघटनेवर आधारित चित्रपट वा मालिका निर्माण केली जाते तेव्हा त्यात काही पात्रांचे अनुभव एकत्र केले जातात, काही नावं बदलली जातात, घटनांत नाट्यमयता आणण्यासाठी काही प्रसंगांचा समावेश केला जातो. हा कलात्मक स्वातंत्र्याचा भाग असतो. म्हणूनच चित्रपट आणि माहितीपटात फरक असतो. कोणाची सिनेमॅटिक लिबर्टी कोणाला अति वाटेल हे व्यक्तीगणिक बदलत जातं. किती लिबर्टी घ्यावी याचं काही सूत्र नाही. त्यामुळे वाद होणं हे स्वाभाविकच. समाज जिवंत असल्याचं, प्रेक्षक जागरुक असल्याचं ते लक्षण आहे. पण आयसी- ८१४चं वैशिष्ट्य असं की ज्या बाबतीत अजिबात लिबर्टी घेतलेली नाही, त्याच मुद्द्यावरून वाद निर्माण केला गेला. असं होतं, तेव्हा त्या दुखावलेल्या भावना कितपत खऱ्या आहेत, असा प्रश्न पडणं स्वाभाविक असतं.

समाप्त