-सुकृता पेठे

३५० कोटी वर्षांपूर्वीपासून सुरुवात करूया. पृथ्वीवर फक्त एकपेशीय जीव रहात होते. भूगर्भातील आणि हवेतील उष्णता आणि मूलद्रव्ये यांच्या मदतीने किण्वन (Fermentation) करून ते जगत. अचानक त्यांच्या आयुष्यात एक बदल झाला. हिरव्या-निळ्या रंगाचे जीवाणू (Cyanobacteria) हुशार झाले. सौरऊर्जा आणि कार्बन डायऑक्साइड शोषून आपले अन्न आपणच कसे तयार करायचे हे शिकले. या क्रांतीने आत्मनिर्भर झालेल्या जीवाणूंची ‘आबादी’ वाढू लागली. परंतु अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत बाहेर पडणारा वायूही हवेत वाढू लागला. हा वायू या जीवाणूंसाठी घातक होता. म्हणजे त्यांच्यासाठी ते प्रदूषण होते. यामुळे इतरही अनेक एकपेशीय जमाती नष्ट होऊ लागल्या. पृथ्वीच्या आयुष्यातील हे सगळ्यात मोठे जल, वायू आणि भू प्रदूषण मानले जाते आणि हा वायू होता ऑक्सिजन! कोट्यवधी वर्षे राज्य करणारे जीव नष्ट झाले. सगळे जीव संपले नाहीत. पण कार्बन डाय ऑक्साईड कमी झाल्यामुळे ऑक्सिजनवर जगणारे जीव पुनरुज्जीवित झाले. त्यांची संख्या वाढू लागली. हिरव्या-निळ्या रंगाचे जीवाणू कुठेतरी सागर तळाशी शिल्लक राहिले. तसेच हिरव्या वनस्पतींच्या हरितद्रव्याच्या उगमाशीही ते आपले नाते सांगत राहिले.

world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा…
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
challenges in infrastructure development in india
महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?
article about donald trump strategy to win us presidential election 2024
प्रचारात लोकांचे मुद्दे हरले, ट्रम्प जिंकले!
no alt text set
लेख: भारत-चीन समझोता की डावपेच?
Redevelopment is essential for safety middle class citizen Lands freehold
सुरक्षिततेसाठी पुनर्विकास अपरिहार्य

नंतर मात्र ऑक्सिजनवर जगणारे जीव उत्क्रांत होत गेले. कधी जीवांच्या प्रक्रियेत बनणारा कॅल्शियमचा कचरा वाढून हळूहळू पृष्ठवंशी जीव (vertebrates) तयार झाले. याच जीवांची परमोच्च उत्क्रांती म्हणजे आपण- मानव असे वैज्ञानिक जगात मानले जाते. आता मानवी क्रियांमधून पुन्हा एकदा वायूप्रदूषण, जलप्रदूषण आणि भू-प्रदूषण होत आहे. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ हे सत्य असले तरी मानवाचा जन्म जेमतेम दोन लाख वर्षांपूर्वी झाला आहे. त्यामुळे आपल्याच कृत्यांमुळे ऑक्सिजनवर जगणारे आपल्यासारखे उत्क्रांत प्राणी पुन्हा काही हजार वर्षांतच संपू नयेत. लोकसंख्या जशी जशी वाढते आहे तसा आपल्या शरीरातून बाहेर पडणारा ‘मैला’ वाढत आहे आणि त्याच्या कितीतरी पटींनी मानवनिर्मित प्रदूषण पाणी, माती आणि हवा व्यापून टाकत आहे.

आणखी वाचा-‘डेरा’वाल्यांचे राजकारण जिंकत राहाते…

मानवाच्या शारीरिक प्रक्रियांचा पाण्याशी निकटचा संबंध आहे. म्हणूनच पाणी वाहून नेणारी नदी आपल्या आरोग्यावर प्रभाव टाकते. सहाजिकच नदीच्या आजुबाजुलाच मानवी वस्त्या वाढू लागल्या. नद्यांच्या आधाराने मोठमोठ्या संस्कृती विकसित झाल्या. नदी शुचितेसाठी अत्यावश्यक असल्याने तिला पवित्र मानले जाऊ लागले. नदीला आपल्या जीवनात पर्यायाने संस्कृतींमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. आपल्याच संस्कृतीचे उदाहरण पहायचे झाले तर धार्मिक शुभकार्यापासून अंत्यविधीसाठी नदीचे महत्त्व, नदीचे स्थान हे सर्वमान्य आहे. गंगामाई आठवून पहा. गंगेच्या किनारी एकीकडे झाजांच्या गजरात, हजारो ज्योतींनी दररोज केला जाणारा ‘गंगाआरती’ सारखा नयनरम्य सोहळा असतो तर तिच्याच काठावर हरिश्चंद्र घाटासारखे कधीही चिता न विझणारे घाटही असतात. नदीला तीर्थ म्हटले जाते म्हणून तिच्या आजूबाजूला तीर्थक्षेत्रे उदयाला आली. गंगेच्या तीर्थांने पावन झालेले काशी हे असेच एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. गंगाजलात मनुष्यजातीच्या पातकांचे क्षालन शोधणाऱ्या साधुंचा, संतांचा मेळा तिच्या काठावर असतो तर त्याच गंगेच्या किनाऱ्यावर पहाटेच्या समयी आपल्या सनईच्या मंगल सुरांनी वातावरण संमोहित करून टाकणारे बिस्मिल्ला खाँ साहेबही आपल्या सुरांच्या रूपाने रेंगाळत असतात. साधना, शुचिता, गहन प्रश्नांची उकल, आनंदाचा सोहळा आणि अंतिम मुक्काम या आयुष्यातील तत्वज्ञानाच्या गोष्टी गंगामाईच्या सानिध्यातच आपल्याला समजतात. काशीला जाऊन रहाता नाही आले तरी गावातील प्रत्येक नदीला आपण गंगापण दिलेले आहे.

गंगा, सरस्वती, सिंधूर, ब्रह्मपुत्रश्यच गण्ड़की… मग ती कुठलीही नदी असो, तिच्या घाटांवर माणसांची अशीच लगबग असते. आधुनिक काळात आपल्या विशाल पात्रावर बांधलेल्या धरणांनी नदी वीजनिर्मितीचे साधन ठरली. मानवाच्या प्रगतीचा तो महत्त्वाचा टप्पा असला तरी औद्योगिक क्रांतीनंतर नदीचा उपसा अनेक पटींनी वाढला. तिच्यामध्ये येणारा मैला, औद्योगिक टाकाऊ पदार्थ त्याहून कितीतरी अधिक पटींनी वाढले.

आणखी वाचा-हरियाणात राजकीय सत्ता बदलली, म्हणून स्त्रियांची स्थिती पालटेल?

कुठेतरी डोंगरावर पर्वतातील दगडांमध्ये पाझर फुटतो. कड्या-कपारींतून उनाडपणे उड्या मारत, झरा धावू लागतो. धावता धावता अनेक सवंगडी त्याला येऊन मिळतात आणि ओढे तयार होतात. ते ओढे सुद्धा समुद्राकडे जायच्या ओढीने एकमेकांना येऊन मिळतात आणि कधी त्यांचे रूपांतर एका शांत समंजस लोकमातेमध्ये कधी होते, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही.

ती तिच्या किनाऱ्यावरच्या जीवनामध्ये गुरफटून जाते. त्यांचे जीवन निर्मळ आणि समृद्ध करण्यात तिच्या वाहण्याचा वेग कमी होतो. पात्र विशाल होते. मायेच्या ओलाव्याने आजुबाजुचा परिसर अंकुरतो, बहरतो. पण ती वहायचे विसरत नाही. संथ गतीने का असेना पण समर्पणासाठी पुढे पुढे जात जाते. आपल्या प्रवाहाबरोबर दगड, माती, कचरा यांचा सगळा गाळ पचवते. तिच्या किनाऱ्यावर विसावणाऱ्यांचे पाय ती प्रेमाने कुरवाळते. त्यांची तळमळ शांत करण्याचा प्रयत्न करते.

पण आपण मात्र तिला गृहीत धरत गेलो… एकीकडे तिला आई म्हणतानाच, तिला नगण्य समजू लागलो. म्हणूनच आजच्या विकसित शहरांच्या सुंदर सुंदर चित्रांमध्ये नदी नसते. नदी बघायची तर गाव नाहीतर निसर्ग चित्रात हे आपल्या मनानेसुद्धा स्वीकारले आहे. मोहेंजोदडो किंवा सिंधू संस्कृती सारख्या प्रगत संस्कृतींमध्ये मैला वाहून नेण्यासाठी प्रणाली आढळतात. हा मैला जलस्रोतांमध्येच म्हणजेच नदीमध्ये सोडला जाई. काळाच्या ओघात लुप्त झालेल्या या प्रगत प्रणालींनंतर आधुनिक काळातील म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्रजी अभियंता जोसेफ बझलगेट यांनी सिमेंट वापरून केलेली भूमिगत गटार योजना ही एक महत्त्वाची प्रणाली ठरली. भूजलप्रदूषणामुळे पसरणारे रोग नियंत्रणात आले खरे, पण आपला सगळा मैला एकत्र नद्यांमध्ये पडू लागला आणि नदीचा नाला होऊन गेला!

आणखी वाचा-उपभोगशून्य स्वामी!

१८५८ च्या उन्हाळ्यात कमी झालेले पाणी आणि अख्ख्या शहराचा जमा होणारा मैला यांच्या एकत्रित परिणामाने लंडनच्या ‘थेम्स’ नदीतून येणारा दुर्गंध ‘The Great Stink’ या नावाने ओळखला गेला. राणीच्या दरबारात दुर्गंधी येऊ लागली. कित्येकदा या वासामुळे कामकाज थांबवावे लागले. खिडक्यांना चुन्यात भिजवलेले पडदे लावणे असे काही उपाय केले गेले पण थेम्सचा दुर्गंध काही कमी झाला नाही. अशी ही आपल्या गटार पद्धतीची महती. हा The Great Stink नक्की कसा असेल हे मिठी नदीवरच्या पुलावर अनुभवास येते. The Great Stink सुद्धा फिका वाटेल एवढी दुर्गंधी पसरलेली असते. पुढे या गोऱ्या साहेबांनी ते जिथे जिथे गेले तिथे स्वतःपुरती ही भूमिगत गटार पद्धत विकसित केली. गरीब वस्तीत मात्र त्यांनी खर्च करणे टाळले. औद्योगिक क्रांतीनंतर शहरांमधील अनेक नद्यांना विदारक नाल्याचे स्वरूप आले. शहरांमधल्या नद्या या नकाशावरच पहायला मिळू लागल्या. आजही नद्यांना प्रत्यक्ष पहू गेलो तर दुर्गंधीयुक्त परिसर आणि प्रदूषित पाणी असलेले नालेच पहायला मिळतात.

आज जगातील बहुतेक सर्व विकसित आणि विकसनशील देशांत भूमिगत गटार प्रणाली आहे. ती १९ व्या शतकापासून अस्तित्त्वात असल्याने आता जुनी झाली आहे. वाढलेल्या लोकसंख्येचा मैला वाहून नेण्यासाठी ती पुरेशी नाही. तरीही आपल्या जलस्रोतांचे अथक प्रदूषण करण्याचे काम या प्रणाली चोख करत आहेत. ती बदलायची झाली तर कित्येक कोटी डॉलर्सचा खर्च होईल. म्हणूनच नदी शुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. नद्यांमध्ये मैला सोडण्यापूर्वी किंवा कारखान्यातून घातक रासायनिक कचरा सोडण्यापूर्वी, योग्य प्रक्रिया करून सोडणे आवश्यक आहे. आपला मैला जलस्रोतांमध्ये सोडून जलप्रदूषण करण्यापेक्षा शोषखड्डा, एसटीपीसारख्या प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यकच आहे. जलशुद्धीकरण प्रक्रिया कितीही प्रगत केली तरी पाणी पूर्णपणे शुद्ध करणे आता अशक्यच होते आहे. जलजन्य रोगांच्या सततच्या अस्तित्वामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन शहरांचे आरोग्य हरवून बसले आहे.

नदीचा संस्कृतीवर परिणाम होत असल्याने १९८५ साली ‘राम तेरी गंगा मैली’ नावाचा चित्रपटही आला. चित्रपटाची कथा वेगळी असली तरी चित्रपटाच्या नावामुळे त्यावेळी म्हणजे १९८५ च्या सुमारास आकार घेत असलेल्या Ganga Action Plan (GAP) कडे आणि मलीन झालेल्या गंगेकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले असणार हे नक्कीच.

आणखी वाचा-‘व्होट जिहाद’ प्रचारातला खोटेपणा

ब्रिटिश कोलंबिया वॉटर्वेज अर्थात BC River म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे महत्त्व समजावे म्हणून १९८० सालापासून मार्क अँजेलो नावाच्या जलतज्ज्ञाने २२ सप्टेंबरला BC River Day साजरा करण्यास सुरुवात केली. पुढे २००५ मध्ये युनायटेड नेशनने जगातील सर्वच नद्यांचे महत्त्व अधोरेखित व्हावे या करिता सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी जागतिक नदी दिन साजरा करण्याचा अँजेलो यांचा प्रस्ताव मान्य केला. याच लेखकाचे The Little Creek That Could: The Story of a Stream That Came Back to Life हे पुस्तक जरूर वाचावे, असे आहे. River Man of India किंवा ज्यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जातात असे राजेंद्र सिंह यांनीही आपले आयुष्य नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अर्पण केले आहे. ही दोन नावे प्रातिनिधिक घेतली आहेत. अनेक पर्यावरण प्रेमी यासाठी नवनवीन उपाययोजना शोधत आहेत आणि अंमलात पण आणत आहेत. नदी एक प्रचंड मोठी परिसंस्था (Ecosystem) असते. जलचर जीव, वनस्पती यांचे एक गुंतलेले वास्तव्य असते. ही परिसंस्था जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

(लेखिका साठ्ये महाविद्यालय (स्वायत्त) येथे भौतिकशास्त्र विभागप्रमुख आहेत)