प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ
कोणत्याही प्रदेशाचा विकास साधताना समतोल व समन्यायी विकासावर भर देऊन त्यादृष्टीने पावले उचलली गेली पाहिजे. असमतोल विकास अशांतताच निर्माण करतो. शक्तिपीठ महामार्ग हाती घेताना हेच तत्त्व धाब्यावर बसविल्याचे दिसते.

विदर्भ व मराठवाड्यात सिंचन अधिक महत्त्वाचे आहे, कारण मागील वर्षी (२०२४) २७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे दिवसाला सरासरी सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच पश्चिम विदर्भात व मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना चालना देणे गरजेचे आहे, कारण या भागांत रोजगाराच्या संधी अल्प प्रमाणात आहेत. रोजगारासाठी स्थलांतर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वांत कमी दरडोई उत्पन्नाच्या प्रदेशांमध्ये हे विभाग आहेत.

विकासासाठी पायाभूत सुविधा निश्चितच महत्त्वाच्या असतात. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई असा आहे. आज नागपूर ते मुंबई चारपदरी राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना, समृद्धी महामार्गाची काय गरज होती, हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. समांतर पायाभूत सुविधा भविष्यात उपयोगी पडतील, यात शंकाच नाही, परंतु अशा समांतर पायाभूत सुविधांऐवजी आवश्यक सुविधा जसे सिंचन, उद्याोग यांना प्राधान्यक्रमांत अग्रस्थान देणे गरजेचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात मागासलेल्या विभागात, विकासाच्या तीन क्षेत्रांत म्हणजे कृषी, उद्याोग व सेवा क्षेत्रात नियोजनबद्ध विकासाचा आराखडा प्राधान्याने आखणे आणि त्याची तातडीने व काटेकोर अंमलबजावणी करणे अतिशय आवश्यक आहे.