पृथ्वी, पृथ्वीच्या परिसरातील वातावरण, सजीव सृष्टी आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचे घटक म्हणजेच वनस्पती व प्राणी. या दोन्ही घटकांमधील लक्षावधी उपप्रकार. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाह्य़ भागात असलेल्या ग्रह-ताऱ्यांवर जीवसृष्टी आहे किंवा नाही, पृथ्वीवर सजीवसृष्टी केव्हा, कशी निर्माण झाली असावी. सजीवसृष्टी निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अनेक संशोधक, शास्त्रज्ञ, अभ्यासक खूप दशके कार्यरत आहेत.
परमेश्वराने  पृथ्वी आणि सजीवसृष्टी अनादी काळात निर्माण केली, असा समज बहुतेकांचा असतो. परंतु, परमेश्वर ही संकल्पना त्याच्यामधील जबरदस्त शक्ती आणि जीवसृष्टी निर्मिती यावर चिकित्सक, बुद्धिवंतांचा सहजपणे विश्वास बसत नाही. वेगवेगळ्या प्रयोगांवर, सिद्धांतांवर आधारून प्रत्यक्ष कोणत्या प्रक्रिया घडल्या असतील, या विषयी मत भक्कम पुराव्यानिशी जगासमोर ठेवले जाते.
अनेक संशोधकांनी वेगवेगळे निकष लावून, प्रयोग करून, पुरावे गोळा करून या अतिभव्य सजीवसृष्टीचे मूलस्थान, उगमस्थान पाणी (वॉटर) हेच आहे, असे मान्य केले. परंतु पृथ्वीवर पाण्याची निर्मिती का, कशी, केव्हा झाली याचाही खोलात जाऊन शोध घेण्याचे महाप्रयास पूर्ण केले.
पृथ्वीचा सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामध्ये  पॅसिफिक (प्रशांत), अ‍ॅटलांटिक, हिंदी महासागर, आर्टिक (उत्तर ध्रुवीय), अंटार्टिक  (दक्षिण ध्रुवीय) या अतिभव्य पाणसाठय़ांचा समावेश होतो. त्यानंतर लहान-मोठे समुद्र, सरोवरे, नद्या, तळी यांचा क्रम लागतो. पृथ्वीवरील शिल्लक तीस टक्के भूभागात जंगले, डोंगर, पर्वत, वाळवंटे, गवताळ प्रदेश इत्यादींचा समावेश होतो.
सजीवाची निर्मिती होण्यास ऑक्सिजन (प्राणवायू) योग्य तापमान, काही रासायनिक घटक, मूलद्रव्ये यांचे योग्य प्रमाण अत्यावश्यक असते. पाण्याच्या रेणूचे पृथक्करण केल्यास त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांची नितांत आवश्यकता असते. यातील हायड्रोजनचा अणू घनभारीत (पॉझिटीव्हल चाज्र्ड), तर ऑक्सिजनचा अणू ऋणभारीत (निगेटिव्हली चाज्र्ड) असल्याने त्यांच्यात परस्पराकर्षण घडते. त्यापासून पाण्याचा एच२ओ रेणू तयार होतो. पाण्याच्या रेणूची रासायनिक प्रक्रियेने होणारी निर्मिती आणि त्यातील विलक्षण ऊर्जा याचाच परिणाम म्हणजे सजीवसृष्टी निर्मिती. हे मूलतत्त्व, असंख्य शास्त्रज्ञ, संशोधक, विचारवंतांनी मान्य केले आहे.
पाण्याच्या रेणूमध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. सामान्य तापमानाला आणि तापमानातील मोठय़ा फरकामध्येसुद्धा तो द्रवरूप राहणारा संयुग आहे. पाण्याची द्रवरूपता ४ अंश सेल्सिअसपासून ९६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानापर्यंत विस्तारलेली असते. ४ अंशपेक्षा तापमान कमी झाल्यास त्याचे बर्फ बनते. म्हणजेच घनअवस्था प्राप्त होते. ९६ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान वाढल्यास वायूरूप म्हणजेच वाफेत रूपांतर होते. पाण्याची घन किंवा वायुरूप अवस्था झाली तरी त्यातील गुणधर्म अजिबात बदलत नाहीत.
पाण्यात जास्तीत जास्त घन किंवा द्रवरूपातील पदार्थ विरघळतात. वेगवेगळ्या प्रक्रिया करून विरघळलेले घनपदार्थ पुन्हा मिळविता येतात. तेलकट घटकांची पाण्याच्या रेणूसमवेत क्रिया घडून बुडबुडय़ांच्या रूपात ते पुन्हा प्राप्त होतात. पाण्यात विरघळलेले प्रथिनयुक्त घटक एकत्रित येऊन प्राथमिक अवस्थेत आढळू शकतात. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन, बहुतांश जलचरांना कल्ले किंवा त्वचेमार्फत शोषून घेता येतो. या एकमेव गुणधर्मामुळे असंख्य प्रकारचे जलचर पाण्यात जगू शकतात.
पहिला अतिसूक्ष्म सजीव हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग घडताना निर्माण होणाऱ्या ऊर्जेमधून तयार झाला. एकपेशीय अतिसूक्ष्म सजिवांच्या शरीरात बदल घडत गेले आणि बहुपेशीय सजिवाची निर्मिती झाली. बहुपेशीयांच्या शरीरात वेगवेगळ्या संस्था निर्माण होऊन प्राण्यांचे, वनस्पतींचे प्रकार निर्माण झाले. पाण्यातील सजिवांची संख्या वृद्धिंगत होऊन शारीरिक बदल घडत गेल्याने सजीव पाण्यातून बाहेर पडून जमिनीवर वावरू लागला.
पाण्याचे द्रवरूपातून घनरूपात (बर्फात) बदल आणि पुनश्च बर्फातून पाण्यात रूपांतरित होण्याच्या गुणधर्मामुळे नद्या, समुद्र कधीही गोठू शकत नाहीत. परग्रहांवर पाणी नक्कीच नाही, पण द्रवरूप मिथेन असल्याने तेथे सजीवसृष्टी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
पाण्याच्या रेणूमध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. सामान्य तापमानाला आणि तापमानातील मोठय़ा फरकामध्येसुद्धा तो द्रवरूप राहणारा संयुग आहे. पाण्याची द्रवरूपता ४ अंश सेल्सिअसपासून ९६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानापर्यंत विस्तारलेली असते.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण