श्रीलंकेविरूद्ध दणदणीत विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची ट्वेन्टी-२० विश्वचषकात आर्यलडशी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेशाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. दुसरीकडे सततच्या पराभवांमुळे आर्यलडचे स्पर्धेतले आव्हान संपल्यागत जमा आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला टक्कर देत सन्मान वाचवण्याचा आर्यलडचा प्रयत्न असेल.
न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका समोरासमोर
बंगळुरू : फिरकीला अनुकूल बंगळुरूच्या खेळपट्टीवर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ समोरासमोर आहेत. न्यूझीलंडच्या पुरुष संघाप्रमाणे महिला संघही दमदार फॉर्ममध्ये असून त्यांनी तीनपैकी तिन्ही लढतीत विजय मिळवला आहे. तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेला नमवत ताकद आजमवण्याची न्यूझीलंडला उत्तम संधी आहे. दुसरीकडे उपांत्य फेरीत प्रवेशासाठी फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला रोखण्याचे खडतर आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर आहे.