भारताचा सध्याचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मैदानातील उल्लेखनीय कामगिरीसोबतच कोहलीच्या मैदानाबाहेरील लोकप्रियतेतही तितकीच वाढ झाली आहे. मैदानातील विक्रमांसोबत विराटच्या खात्यात आता जाहिरातीच्या मानधनाचाही एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. विराटने बॅटवर लावण्यात येणाऱया स्टिकरच्या माध्यमातून तब्बल ८ कोटींची कमाई केली आहे. याआधी बॅटवरील स्पार्टन्सच्या स्टिकरसाठी धोनीला सहा कोटींचे मानधन देण्यात आले होते. तर विराटच्या बॅटवर असलेल्या ‘एमआरएफ’च्या स्टिकरसाठी कंपनीने त्याला ८ कोटींचे मानधन दिले आहे. याशिवाय, त्याच्या बुटावरील जाहिरातीसाठी कंपनीने दोन कोटी मोजले आहेत. (Full Coverage|| Fixtures|| Photos)
दरम्यान, बॅटवरील स्टिकरमधून मिळणाऱया मानधनात विराटने धोनीला मागे टाकले असले तरी टेलिव्हिजन जाहिरातींतून मिळणाऱया उत्पन्नामध्ये धोनीच अव्वल स्थानावर आहे. धोनीला टेलिव्हिजनवरील जाहिरातीतून ८ कोटी मिळतात, तर विराटला  ५ कोटींचे उत्पन्न मिळते.