चार्जिंगच्या समस्येपासून अशी मिळवा सुटका; फक्त ५४९ रुपयांमध्ये विकत घ्या पॉवर बँक, पाहा यादी | Amazon online sale Most Affordable 10000 mah power bank price starts at rupees 549 see list | Loksatta

चार्जिंगच्या समस्येपासून अशी मिळवा सुटका; फक्त ५४९ रुपयांमध्ये विकत घ्या पॉवर बँक, पाहा यादी

सध्या सुरू असणाऱ्या ऑनलाईन सेलमध्ये पॉवर बँकवर मोठी सूट देण्यात येत आहे. बूक करण्याआधी ही यादी पाहून घ्या.

चार्जिंगच्या समस्येपासून अशी मिळवा सुटका; फक्त ५४९ रुपयांमध्ये विकत घ्या पॉवर बँक, पाहा यादी
Photo : Freepik

सध्या सर्वत्र ऑनलाईन सेल्सची चर्चा सुरू आहे. या ऑनलाईन सेल्समध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर ७० ते ८० टक्क्यांची मोठी सूट देण्यात येत आहे. त्यातीलच एक प्रोडक्ट म्हणजे पॉवर बँक. सध्याच्या काळात मोबाईलला चार्जिंग करण्याची गरज सतत भासतेच. आपण दिवसभरातला बराच वेळ मोबाईलवर घालवतो. त्यामुळे मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर जवळ ठेवावा लागतो किंवा इतरांकडे असलेला चार्जर वापरावा लागतो. पण प्रत्येक वेळी चार्जरची सोय होतेच अस नाही. त्यामुळे बऱ्याचदा चार्जिंग नसल्यामुळे फोन बंद पडतो. अशावेळी जर तुमच्याजवळ पॉवर बँक असेल तर तुम्हाला ती नक्की उपयोगी पडेल.

फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सुरू असणाऱ्या ऑनलाईन सेलमध्ये काही पॉवर बॅंक्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. यापैकी कोणते पॉवर बँक उत्तम आहेत आणि फीचर्ससह त्यावर किती ऑफर आहे जाणून घेऊया.

आणखी वाचा : ‘हा’ आहे बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; ३० दिवसांसाठी कॉलिंग आणि डेटा होतो उपलब्ध

pTron Dynamo Lite 10000mAh Li-Polymer Power Bank

  • या पॉवर बँकची मुळ किंमत २,४९९ रुपये आहे. पण अमेझॉन सेलमधील ७८% सूट या ऑफरमुळे ही पॉवर बँक केवळ ५४९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • या ऑफरमुळे एकूण १,९५० रुपयांची बचत होत आहे.
  • या पॉवर बँकेची क्षमता १०,०००एमएएच आहे आणि यामुळे कोणताही स्मार्टफोन सहज चार्ज करता येतो.
  • यावर बँक ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. एसबीआय डेबिट कार्ड पेमेंटवर ३०० रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते.

Croma 12W Fast Charge 10000mAh Lithium Polymer Power Bank
या पॉवर बँकची किंमत १,००० रुपये आहे. परंतु यावर असणाऱ्या ४५% सूट या ऑफरमुळे ही पॉवर बँक ५४९ रुपयांना उपलब्ध होते. यामुळे ४५१ रुपयांची बचत होत आहे.

URBN 10000 mAh Li-Polymer Ultra Compact Power Bank

  • या पॉवर बँकची मुळ किंमत २,४९९ रुपये आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन सेल दरम्यान ७२% सूटमुळे ही पॉवर बँक केवळ ६९९ रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.
  • ही पॉवर बँक १०००mAh बॅटरीसह 12W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Mi 10000mAH Li-Polymer, Micro-USB and Type C Input Port, Power Bank
या पॉवर बँकेची मुळ किंमत २,१९९ रुपये आहे, परंतु ऑनलाईन सेलमधील ५९% सूटमुळे ही पॉवर बँक ५९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

आणखी वाचा : ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या

Ambrane 10000 mAh Lithium Polymer Stylo-10k Power Bank

  • या पॉवर बँकची मुळ किंमत १,५९९ रुपये आहे परंतु सेलमधील ५९% सवलतीनंतर ही पॉवर बँक केवळ ६९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे ९०० रुपयांची बचत होते. या पॉवर बँकमध्ये २०W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि १००० mAh बॅटरी आहे.
  • बँक ऑफरदेखील उपलब्ध आहे. एसबीआय डेबिट कार्ड पेमेंटवर ३०० रुपयांची सूट दिली जाऊ शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Instagram Hack : इन्स्टाग्राम हॅक झाल्यावर लगेच वापरा ‘ही’ ट्रिक; अकाउंट राहील सुरक्षित

संबंधित बातम्या

विश्लेषण : ट्विटरच्या अधिग्रहणात इलॉन मस्क यांना महत्त्वपूर्ण मदत करणारे श्रीराम कृष्णन आहेत तरी कोण?
मेड इन इंडिया ड्रोनचं ताशी १०० किमी वेगाने उड्डाण, १५० किलो माल वाहून नेण्याची क्षमता
EPFO Update: जर तुम्ही ईपीएफ खात्याशी संबंधित हे काम केलं नाही, तर तुम्ही पासबुकचे डिटेल्स पाहू शकणार नाहीत
5G साठीची तगडी स्पर्धा! केवळ १५ हजारात iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री, जाणून घ्या फीचर्स
OnePlus 10R Prime Blue Edition: 12GB RAM आणि 256 GB स्टोरेजसह भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द