scorecardresearch

Premium

भूकंप येण्यापूर्वीच नागरिकांना मोबाईल मिळेल धोक्याची सूचना, Google नं जारी केलं नवं फीचर, पाहा कसं करेल काम

आता या अलर्टच्या मदतीने लोक भूकंप येण्यापूर्वी सतर्क होतील.

Google launches Android Earthquake Alerts in India
भूकंपाच्या आधी स्मार्टफोनवर मिळणार अलर्ट (Photo-Google)

Google Earthquake Alert system in India: भूकंप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा थरकाप. भूकंप ही नक्कीच एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि एक भयानक आहे. शिवाय, भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते. भूकंप ही एक अशी आपत्ती आहे जी थांबवणे अशक्य आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांनी भूकंपामुळे झालेला विध्वंस पाहिला आहे. भूकंप कधी आणि किती वेगाने होईल, हे आतापर्यंत कोणीही सांगू शकत नव्हते. पण आता ते शक्य झाले आहे. टेक जायंट गुगलने एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याद्वारे तुम्हाला भूकंप येण्यापूर्वी त्याची माहिती मिळेल आणि तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकाल.

Google ने भारतात आपली ‘अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम’ लाँच केली आहे. जे येऊ घातलेल्या भूकंपाची चेतावणी देईल. या फीचरच्या मदतीने लोकांना भूकंपाची अगोदर माहिती मिळेल आणि लोक ते ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतील. भूकंपामुळे आतापर्यंत झालेली जीवित आणि मालमत्तेची हानी लक्षात घेता हे वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

nitin gadkari
देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जाणार – नितीन गडकरी
iPhone 14 Plus available at Rs 73,999
iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३६ हजारांचा डिस्काउंट
flipkart give 35,501 rs discount on iphone 14
iPhone 14 स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३५ हजारांचा डिस्काउंट
iphone 13 mini massive discount on flipkart
iPhone 15 सिरीजच्या लॉन्चिंगआधी ‘हा’ आयफोन केवळ २४ हजारांमध्ये खरेदी करण्याची संधी, ऑफर्स एकदा पाहाच

(हे ही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपचा हिरवा रंग बदलणार? पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, ‘या’ स्मार्टफोनमध्ये येणार अपडेट )

Google ने NDMA म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि NSC म्हणजेच राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र यांच्याशी सल्लामसलत करून ते भारतात जारी केले आहे. मात्र, सध्या हे फीचर फक्त अँड्रॉईड यूजर्ससाठीच जारी करण्यात आले आहे. भूकंप ओळखण्यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे.

यूजर्सना मिळणार दोन प्रकारचे मेसेज

फोनला भूकंप येणाऱ्या असल्याचे जाणवल्यावर त्वरित गुगलच्या अर्थक्वेक डिटेक्शन सर्व्हरला सिग्नल पाठवेल. गुगलची भूकंप सूचना प्रणाली अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये उपस्थित असलेल्या एक्सलेरोमीटरचा वापर करेल. त्याच्या मदतीने, हे फीचर वापरकर्त्यांना भूकंपांबाबत आधीच सावध करेल. गुगलने हे फीचर आधीच अनेक देशांमध्ये जारी केले आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, ही नवीन प्रणाली अँड्रॉइड फोनला भूकंप शोधक उपकरणात बदलेल. भूकंप इशारा प्रणालीमध्ये, Google वापरकर्त्यांना दोन प्रकारचे अलर्ट पाठवेल, त्यापैकी एक सावधगिरी बाळगा तर दुसरा संदेश कारवाई करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Android users in india can now get alerts for earthquakes thanks to a new system launched by google pdb

First published on: 29-09-2023 at 11:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×